शीतलवाडी टी पाॅइंट परिसरात अवैध धंदे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST2021-01-16T04:10:59+5:302021-01-16T04:10:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शीतलवाडी (ता. रामटेक) टी पाॅइंट परिसरात अतिक्रमणासाेबत अवैध धंद्यांमध्ये माेठी वाढ झाली असून, त्यामुळे ...

शीतलवाडी टी पाॅइंट परिसरात अवैध धंदे वाढले
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शीतलवाडी (ता. रामटेक) टी पाॅइंट परिसरात अतिक्रमणासाेबत अवैध धंद्यांमध्ये माेठी वाढ झाली असून, त्यामुळे महिलांसह तरुणींना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासन व रामटेकचे ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
शीतलवाडी येथील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यांतील काहींनी अतिक्रमण करून दुकाने थाटली असून, हाॅटेल, खाद्यपदार्थाची दुकाने व पानटपऱ्या थाटल्या आहेत. यांतील काही पानटपऱ्यांवर सट्टापट्टीचे व्यवहार हाेत असून, काही प्रतिष्ठानांमधून अवैध दारूविक्री केली जाते. अवैध धंद्यांमुळे या भागात हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, महिलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या भागातील अतिक्रमण हटवावे; तसेच पाेलीस प्रशासनाने येथील अवैध धंदे बंद करावे्, अशी मागणी या निवेदनात केली आहे.