शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

नागपूर विमानतळालगतचे अवैध बांधकाम तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 11:48 IST

विमानाचे उड्डाण आणि धावपट्टीवर उतरण्यास अडथळा ठरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या काही इमारतींचे अवैध माळे पाडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएमआयएलतर्फे नोटिसा विमानांना अडथळा१० ते १५ इमारतींवर गाजदोन मोबाईल टॉवर

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमानाचे उड्डाण आणि धावपट्टीवर उतरण्यास अडथळा ठरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या काही इमारतींचे अवैध माळे पाडण्यात येणार आहे. विमातळालगतच्या इमारतींचे सर्वेक्षण केल्यानंतर मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) सहा इमारतींना नोटिसा दिल्या असून, दोन ते चार माळे तोडण्यात येणार आहेत. नोटीसला उत्तर देण्यासाठी इमारतींच्या मालकांकडे २५ दिवसांचा वेळ उरला आहे.नोटिसा दिलेल्या इमारतींपैकी काहींचे बांधकाम सुरू आहे. यामध्ये साई बिल्डकॉन-तभाने ले-आऊट, भामटी, ललित बिल्डर्स, फुलसुंघे ले-आऊट, भामटी, ग्रीन अर्थ इन्फ्रा प्रोजेक्ट्स, जीएनएसएस, भामटी, मिलिंद कालसैत, प्लॉट २७, फुलसुंघे ले-आऊट, इंद्रप्रस्थनगर, भामटी आणि महेश जांगीड, तभाने ले-आऊट, भामटी आदींचा समावेश आहे. याशिवाय जयताळ्यात पूर्वीच निर्मित रेणुका एन्क्लेव्हला नोटीस दिला आहे. तसेच विमानाच्या ये-जा करिता अडथळा ठरणारे जयताळा येथे दोन इमारतींवर लावण्यात आलेल्या दोन मोबाईल टॉवरकरिता नोटिसा जारी केल्या आहेत. तिसरा भागीदार येण्यापूर्वी विमानतळालगतच्या इमारतींच्या अवैध बांधकामासंदर्भात एमआयएलने कठोर पावले उचलली आहेत. प्राथमिकतेच्या आधारावर विमानतळाच्या चारही बाजूला ५-५ कि़मी. दूर अंतराच्या आत निर्मित आणि निर्माणाधीन इमारतींच्या उंचीवर एमआयएलने लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळाच्या फनल एरियाच्या स्वरूपात जयताळ्याकडील आणखी १० इमारतींना नोटिसा देण्यात येणार आहे. लोकमतने वर्ष २०१८ मध्ये सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विमानांना अडथळा ठरणाऱ्या उंच इमारतींच्या संदर्भात वृत्त प्रकशित केले होते. ७ सप्टेंबरला ‘लॅण्डिंग करताना विमान देतात इमारतींच्या अडथळ्यांचे संकेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हिंगणा क्षेत्रात काही इमारती चिन्हित करण्यात आल्याचे एमआयएलच्या सूत्रांनी सांगितले.

महत्त्वपूर्ण वैशिष्ट्येअडथळा ठरणाऱ्या इमारतींसंदर्भात १९ सप्टेंबरला एएआय व एमआयएलची संयुक्त बैठक़एरोनॉटिकल ऑब्सटिकल सर्वेक्षणाकरिता एमआयएलतर्फे नाशिक येथील कंपनीला ऑक्टोबर २०१८ मध्ये १५ लाखांचे कंत्राट.भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे (एएआय) ‘रेणुका’ आणि ‘प्रोजोन पॉम’ची एनओसी रद्द.काही इमारतींची उंची जास्त असल्यामुळे ३२०० मीटर लांब धावपट्टी ५६० मीटरने कमी करण्याचा एमआयएलकडे प्रस्ताव.नियमानुसार एअरपोर्टच्या चारही बाजूला २० कि़मी.च्या टप्प्यात उंच इमारतींच्या बांधकामासाठी एएआयची एनओसी आवश्यक.व्हीओआर सिग्नलमध्ये अडथळा ठरतेय ‘प्रोजोन पॉम’विमानतळाच्या धावपट्टीच्या थ्रेशहोल्ड पॉर्इंटसमोर निर्मित ‘प्रोजोन पॉम’ इमारतीच्या उंचीमुळे व्हीएचएफ ओमिनी डायरेक्शन रेंज (व्हीओआर) सिग्नल व इन्स्ट्रूमेंटल लॅण्डिंग सिस्टिममध्ये समस्या येत आहे. ही सिस्टिम एएआयशी जुळली आहे. ‘प्रोजोन पॉम’च्या बिल्डरने एएआयद्वारे एनओसी रद्द केल्यानंतर नागरी उड्डयण मंत्रालयात अपील केले आहे. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे.

एमआयएलने सर्वेक्षण केल्यानंतर विमानांचे उड्डाण आणि उतरण्यास अडथळा ठरणाऱ्या इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. या इमारतींना ताबा प्रमाणपत्र देऊ नये, असे मनपाला कळविले आहे.- विजय मुळेकर,वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर