शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पथदिव्यांची माहिती हवी तर एक लाख भरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:32 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधक सक्षम असावेत, अशी भावना व्यक्त केली आहे. कारभारावर विरोधकांचा वचक असावा, हा त्यामागील हेतू आहे. पण नागपूर महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना माहिती तर उपलब्ध होत नाही; एवढेच नव्हे तर माहिती अधिकारात एखाद्या विभागाची माहिती मागू नये, यासाठी तब्बल लाखाहून अधिक शुल्क जमा करण्याचा अफलातून सल्ला दिला जातो.

ठळक मुद्देनगरसेवकांनाही द्यावे लागतात पैसे : माहिती अधिकारात माहिती मागू नये, यासाठी मनपाच्या विद्युत विभागाचा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधक सक्षम असावेत, अशी भावना व्यक्त केली आहे. कारभारावर विरोधकांचा वचक असावा, हा त्यामागील हेतू आहे. पण नागपूर महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना माहिती तर उपलब्ध होत नाही; एवढेच नव्हे तर माहिती अधिकारात एखाद्या विभागाची माहिती मागू नये, यासाठी तब्बल लाखाहून अधिक शुल्क जमा करण्याचा अफलातून सल्ला दिला जातो.काँग्रेसचे ज्येष्ठ नगसेवक संदीप सहारे यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. शहरातील मार्गावर एलईडी दिवे लावल्याने महापालिकेची दर महिन्याला दोन कोटींची बचत होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे एलईडीमुळे किती युनिट वीज बचत झाली तसेच वीज बिलाच्या खर्चात किती बचत झाली, याची माहिती मागितली. मात्र त्यांना माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागितली. परंतु महापालिके च्या प्रकाश विभागाचे माहिती अधिकारी एम.एम.बेग यांनी सहारे यांना २०२३ प्रतिसाठी चक्क १ लाख ५ हजार १९६ रुपये शुल्क जमा करण्याबाबत पत्र दिले.सहारे यांनी एलईडी दिव्यामुळे नेमकी किती आर्थिक बचत झाली, याची माहिती मिळण्यासाठी विद्युत विभागाकडे अर्ज केला. एलईडी व्यवस्था सुरू झाल्यापासून वर्षनिहाय बचत झालेले युनिट व वीज बिलातील बचत, याची माहिती मागितली होती. मात्र त्यांनी माहिती मागू नये, यासाठी त्यांना लाखाहून अधिक शुल्क जमा करण्यास सांगण्यात आल्याची महापालिकेत चर्चा आहे.नगरसेवकांना माहिती मागण्याचा अधिकारमहापालिकेच्या कोणत्याही विभागाची माहिती जाणून घेण्याचा नगरसेवकांना मूलभूत अधिकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असूनही नगरसेवकांना माहिती उपलब्ध केली जात नाही. सत्तापक्षाकडून पारदर्शी कारभाराचा दावा केला, मग एखाद्या विभागाची माहिती देण्यासाठी टाळाटाळ का केली जाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याची माहिती जाणून घेण्यासाठी निगम सचिवांना सहारे यांनी पत्र दिले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRight to Information actमाहिती अधिकार