शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर.. " नागपुरात आरक्षण बचावसाठी ओबीसींचा एल्गार

By आनंद डेकाटे | Updated: October 10, 2025 15:44 IST

नागपुरात सकल ओबीसींच्या महामोर्चाला सुरूवात : हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर, २ सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळा जीआर या रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला. 

मराठा आरक्षणाच्या संदर्भात २ सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैदराबाद संस्थानातील गॅझेटमध्ये 'कुणबी' अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हीच बाब पारंपरिक ओबीसी समाजाच्या असंतोषाचे कारण ठरली आहे. ओबीसी नेत्यांचा ठाम आरोप आहे की, मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामावणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे. या विरोधात काॅंग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयाचा विरोध करण्यासाठी विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव नागपूरच्या रस्त्यावर उतरले आहेत. एक हजाराहून अधिक बसेस, पाच हजाराहून अधिक चार चाकी वाहनाने आंदोलनकर्ते नागपुरात दाखल झालेले आहेत.

यशवंत स्टेडियममधून या मोर्चाला सुरुवात झाली असून संविधान चौकामध्ये मोर्चाचा समारोप होणार आहे. यशवंत स्टेडियममधून मोर्चा निघाला असून प्रत्येक जण हातात पिवळा झेंडा, डोक्यावर पिवळी टोपी आणि गळ्यात पिवळ्या रंगाचा दुपट्टा टाकून सहभागी झाला आहे. त्यामुळे नागपूरचे रस्ते ओबीसीमय झाल्याचे दिसून येत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : OBCs protest in Nagpur to protect reservation rights.

Web Summary : Thousands of OBCs protested in Nagpur against a state government order perceived as encroaching on their reservation rights by including Marathas under the Kunbi certificate. The protest, organized by Congress leader Vijay Wadettiwar, demands the order's cancellation to prevent further unrest and protect OBC interests.
टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण