लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहा. युतीमध्ये जागा वाटपात आपल्याला जागा सोडण्यात आल्या नाही तर स्वबळावर लढा, असे आवाहन रिपाइं (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा विदर्भ सत्ता संपादन कार्यकर्ता मेळावा जवाहर विद्यार्थी वसतिगृह येथे पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी काकासाहेब खामगावकर, अॅड. विजय आगलावे, नागपूर शहराध्यक्ष विनोद थूल, दयाल बहादुरे, पप्पू कागदे, डॉ. पुरण मेश्राम, भीमरावजी बनसोड, बाळू घरडे, राजन वाघमारे, सतीश तांबे, मोरेश्वर डुले, रमेश मेश्राम, जगन डोरले, जयदेव चिंवडे, प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे प्रामुख्याने उपस्थित होते. रामदास आठवले म्हणाले, पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहून काम करावे. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहोत. त्याकरिता कार्यकर्त्यांनी त्याची जाणीव ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक राहुल गजबे यांनी केले. डॉ. मनोज मेश्राम यांनी आभार मानले.
पूर पीडित गरजू शेतकरी बांधवांना मदत करा
- रामदास आठवले म्हणाले, पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहून काम करावे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहोत. त्याकरिता कार्यकर्त्यांनी त्याची जाणीव ठेवून काम करावे.
- तसेच यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली आहे. असे गरजू शेतकरी बांधव आपल्या निदर्शनात आल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी काम करावे.
- पूर पीडित शेतकऱ्यांना जमेल तेवढी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक राहुल गजबे यांनी केले. डॉ. मनोज मेश्राम यांनी आभार मानले.
Web Summary : Ramdas Athawale urges party workers to prepare for local elections. He stated that if seat-sharing arrangements fail, they should contest independently, focusing on party growth and supporting flood-affected farmers and students across Maharashtra.
Web Summary : रामदास अठावले ने पार्टी कार्यकर्ताओं से स्थानीय चुनावों की तैयारी करने का आग्रह किया। उन्होंने कहा कि अगर सीट बंटवारे की व्यवस्था विफल हो जाती है, तो उन्हें स्वतंत्र रूप से चुनाव लड़ना चाहिए, पार्टी के विकास पर ध्यान केंद्रित करना चाहिए और महाराष्ट्र के बाढ़ प्रभावित किसानों और छात्रों का समर्थन करना चाहिए।