शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पुणे करार नसता तर बहुजन सत्तेत असते : वामन मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:54 IST

पुणे करार नसता तर आज बहुजन सत्तेमध्ये दिसले असते. सत्तेची चावी त्याच्या हातात असती, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. एससी, एसटी सहमतीशिवाय राजनैतिक आरक्षण वाढविले जाते. त्यामुळे पुणे कराराचे उल्लंघन होते, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्दे भारत मुक्ती मोर्चाचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुणे करार नसता तर आज बहुजन सत्तेमध्ये दिसले असते. सत्तेची चावी त्याच्या हातात असती, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. एससी, एसटी सहमतीशिवाय राजनैतिक आरक्षण वाढविले जाते. त्यामुळे पुणे कराराचे उल्लंघन होते, असेही ते म्हणाले.भारत मुक्ती मोर्चाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मातंग, इंजी.के.सोनारा, रामसुरेश वर्मा, घनश्याम अलामे, मुकेश चहल, राजीव बसाक प्रमुख अतिथी होते. सामाजिक सेवा आणि राजकीय क्षेत्रात आरक्षण दिले गेले आहे. सामाजिक व सेवा या आरक्षणाला कालमर्यादा नाही. परंतु राजकीय क्षेत्रातील आरक्षणाला कालमर्यादा आहे. हे आरक्षण १९६० पर्यंत ठेवायला सांगण्यात आले होते. परंतु राजकीय आरक्षण वाढविण्यासाठी एससी, एसटीमधील लोकांची, नेत्यांची अथवा त्यांच्या संघटनांची परवानगी घेतली जात नाही. कारण पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांनी एक अट घातली होती की, हे आरक्षण वाढविताना अनुसूचित जाती, जमातीतील नेत्यांना अथवा लोकांना, संघटनेला विचारले जावे. परंतु त्यांना न विचारताच राजकीय आरक्षण वाढविले जाते. पुणे करारामुळे दलालांची निर्मिती झाली. त्यामुळे आजही बहुजनांना हक्क व अधिकारांपासून वंचित राहावे लागले आहे.दलित शब्द असंविधानिकदलित शब्द हा असंविधानिक असल्याचे न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही तो शब्द गौरवाने मिरविला जात आहे. त्यामुळे फार मोठा धोका निर्माण झाल्याचा इशारा देतानाच आपण परिवर्तनवादी लोक आहोत त्यामुळे या शब्दाचा उपयोग करता कामा नये, असे आवाहन वामन मेश्राम यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरPuneपुणे