शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा

By योगेश पांडे | Updated: November 23, 2023 17:39 IST

या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कथित कॅसिनो फोटोवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर राजकारण तापले. या मुद्द्यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राऊत नागपुरात आले तर त्यांना जोडे मारू, असा इशारा दिला आहे. या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बावनकुळे हे मकाऊ येथे कौटुंबिक सहलीसाठी गेले असता कॅसिनोत त्यांनी एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उधळल्याचा आरोप करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या मुद्द्यावर जिल्ह्यातील अपवाद वगळता बहुतांश भाजप आमदार व पदाधिकारी गप्पच राहिले व कुणीही राऊत यांच्यावर टीका केली नाही. सुधाकर कोहळे यांनी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आहेत व ते मूर्ख व्यक्ती आहेत. त्यांनी वायफळ बडबड बंद केली नाही तर त्यांना वैदर्भीय भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यांना अशी चिखलफेक शोभत नाही. मात्र ते असेच आरोप करत राहिले तर त्यांना योग्य प्रत्युत्तर देऊ. ते नागपुरात आले तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना जोडे मारतील, असे कोहळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाSudhakar Kohaleसुधाकर कोहळेnagpurनागपूरShiv Senaशिवसेना