शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

खासगी कंपन्यांना समांतर वीजपुरवठा परवाना दिल्यास वंचित रस्त्यावर उतरणार !

By आनंद डेकाटे | Updated: June 28, 2025 20:19 IST

Nagpur : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात अदानी व टोरंट कंपनीकडून अनेक शहरांत वीज वितरणाच्या परवान्यासाठी अर्ज केले असून खासगी कंपन्यांना वीजपुरवठा परवाना हा वीज मंडळाच्या खाजगीकरणाची सुरुवात असून सरकारने हे समांतर परवाने देऊ नये. अन्यथा या खाजगीकरण धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.  

राज्यात समांतर वीज परवाना, स्मार्ट मीटर योजना, २०० कोटींच्यावरील महापारेषणचे प्रकल्प टी.बी.सी.बी. पद्धतीने देण्याबाबतच्या धोरणांचे महावितरण व महापारेषण कंपनीचे खासगीकरण केले जात आहे. महावितरणनेही मुंबई शहरातील कुलाबा माहिम, बांद्रा, दहीसर अशा एकूण १३ क्षेत्रात वीज वितरणासाठी परवाना अर्ज दाखल केला आहे. याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे.

विद्युत क्षेत्रातील विविध कामगार संघटनांचे एकत्रित संघटन असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रसिटी वर्कर्स फेडरेशनकडून महावितरणसह शासनाला राज्यव्यापी संपाचा इशारा देण्यात आला. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहणार असून महावितरणच्या खासगीकरणाचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने महाराष्ट्रात आंदोलन करीत असल्यास त्याला पाठिंबा आणि कायदेशीर मदत करू. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यातही महावितरणला 'पर्याय' उभा करण्याचे सरकारी धोरण यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरelectricityवीजnagpurनागपूर