रोख नाही सापडली तर टीव्ही, मिक्सरच लंपास; नागपूरमधील घटना
By योगेश पांडे | Updated: July 27, 2023 13:22 IST2023-07-27T13:21:55+5:302023-07-27T13:22:06+5:30
तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रोख नाही सापडली तर टीव्ही, मिक्सरच लंपास; नागपूरमधील घटना
नागपूर : बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाकडे घरफोडी केल्यानंतर तेथे जास्त रोख रक्कम न सापडल्याने चोरट्यांनी चक्क टीव्ही व मिक्सरदेखील चोरून नेले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रमोद महादेव गौतम (४२, करीम चौक, भिलगाव रोड, कळमना) हे २५ जुलै रोजी घराला कुलूप लावून टाकळघाट येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के व रोख २७ हजार चोरून नेले. सोबतच त्याने एलईडी टीव्ही व मिक्सरदेखील नेला. घरी परत आल्यावर हा प्रकार गौतम यांच्या लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.