शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आयबीटीएम होणार आता मनपाचा ‘घरजावई’!

By admin | Updated: January 28, 2016 03:08 IST

शहरातील बस वाहतुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या स्टार बस आॅपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड

नागपूर : शहरातील बस वाहतुकीची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या स्टार बस आॅपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड यांच्या मनमानी कारभारामुळे आधीच त्रस्त असलेल्या महापालिका प्रशासनाने आता इंटिग्रेटेड बस ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (आयबीटीएम) या नवीन आॅपरेटरची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. त्यांच्याकडे शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे अधिकार राहणार आहे. त्यामुळे आता आयबीटीएम महापालिकेचा नवीन घरजावई होणार असल्याची चर्चा आहे. आॅपरेटरला महापालिका दर महिन्याला १६ लाख ५९ हजार तसेच कर्मचाऱ्यांवर ५२ लाख ७ हजारांचा खर्च करणार आहे. विशेष म्हणजे इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस व १५० डिझेल बसच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या आॅपरेटरकडे सोपविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात शहर बस चालविण्यासाठी दर महिन्याला २.८० कोटींचा तोटा गृहित धरण्यात आलेला आहे. नवीन आॅपरेटरच्या नियुक्ती केल्यानंतर महापालिकेला दरवर्षाला ३२ कोटी १२ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे. यासाठी महापालिका सार्वजनिक वाहतून निधी कोष स्थापन करणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. धोरणात्मक बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. याबाबतचे संपूर्ण अधिकार परिवहन समितीला देण्यात आले आहेत. या समितीचे बजेट स्वतंत्र राहणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव योग्य की अयोग्य, याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या देखरेखीत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात महापालिकेचे नुकसान होणार असेल तर याची योग्य ती दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)