'मै खाऊंगा और खानेवालों की रक्षा करूंगा'; हेच सध्या राज्यातील वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 22:12 IST2022-03-24T22:11:48+5:302022-03-24T22:12:15+5:30
Nagpur News मै खाऊंगा और खिलाऊंगा, अशी मानसिकता असून खाणाऱ्यांचे रक्षण करण्यावर भर दिला जात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केली.

'मै खाऊंगा और खानेवालों की रक्षा करूंगा'; हेच सध्या राज्यातील वातावरण
नागपूर : सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील वातावरण पूर्णत: बदलले आहे. मै खाऊंगा और खिलाऊंगा, अशी मानसिकता असून खाणाऱ्यांचे रक्षण करण्यावर भर दिला जात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. गुरुवारी त्या नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
राज्यात प्रगतीचे राजकारण व्हायला हवे. मात्र, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. हे बंद झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचे राजकारण हवे आहे. जेव्हा हाती ठोस पुरावे असतात, तेव्हाच केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात. त्यांचा तपास निष्पक्ष पद्धतीचा असतो. सध्या सुरू असलेल्या सर्व चौकशांचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यावर सत्य कळेलच. केंद्रीय तपास यंत्रणा कुठेही सूड भावनेने कारवाई करत नाही, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.