कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महायुतीचे सरकार निवडून येताना मतांची चोरी करून निवडून आले आहे. वाढीव ७५ लाख मते कुठून आली याचे उत्तर अजून दिलेले नाही. सरकार शंभर दिवसांच्या कार्यकाळात खोक्या आणि बेताल वक्तव करणारे मंत्री आपण पाहिले. या शंभर दिवसात जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरसंघचालक, योगी आणि काही खासदार जनगणना नको म्हणाले होते. ‘जो जात की बात करेगा, उसे लात दुंगा’, असेही काही लोक म्हणाले होते. आता निर्णय घेतला पण सरकारचे अनेक जुमले आपण पाहिले तसा हा जमला असू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्यादोन्ही पवार येतील, अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले, बऱ्याच चर्चा महाराष्ट्रभर आहे. यावर पूर्ण काही झाल्यावरच भाष्य करता येईल. आम्ही महाविकास आघाडी मधून लोकसभा विधानसभा निवडणुका लढलो आहोत. आम्ही सोबत आहोत. जी काही परिस्थिती पुढच्या काळात निर्माण होईल त्यावर भाष्य करता येईल. आज त्यावर भाष्य करता येणार नाही. जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्या, असा सूचक इशारा सपकाळ यांनी दिला. काँग्रेसने संघटना वर्ष जाहीर केले. त्यानुसार आवश्यक बदल सुरू केले आहेत. हे संघटना वर्ष असल्याने फेरफार आणि आवश्यक बदल वर्षभरात होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पहलगाम हल्ल्यावर अधिवेशन बोलवापहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. या मुद्यावर सरकारसोबत राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत झाला. देश एक आहे, हे दाखविण्यासाठी सरकारने अधिवेशन बोलवावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.