राणा-कडू वादाशी माझा संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 22:15 IST2022-11-03T22:15:02+5:302022-11-03T22:15:39+5:30

Nagpur News आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर खा. नवनीत राणा यांनी बोलण्याचे टाळले.

I have nothing to do with the Rana-Kadu dispute | राणा-कडू वादाशी माझा संबंध नाही

राणा-कडू वादाशी माझा संबंध नाही

नागपूर : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर खा. नवनीत राणा यांनी बोलण्याचे टाळले. मुंबईला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आल्या असता, प्रसारमाध्यमांजवळ त्यांनी वादावर ठोस वक्तव्य न करता ‘नो कमेंट्स’ अशीच प्रतिक्रिया दिली.

रवी राणा आणि बच्चू कडू हे दोघेही माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळते. मी माझ्या कामावर लक्ष देते. कारण माझी कामे माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत, असे त्या म्हणाल्या. मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात आहात का, असे विचारले असता, मुंबई माझे घर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. ते जे सांगतात, ते आम्ही करतो.

कडू व माझ्या पतीमध्ये सुरू असलेल्या वादाशी माझा संबंध नाही. मी घरी रवी राणा यांची पत्नी आहे आणि बाहेर लोकप्रतिनिधी आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

Web Title: I have nothing to do with the Rana-Kadu dispute