खराब हवामानामुळे परत गेले हैदराबादचे विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:59 IST2019-06-11T00:58:39+5:302019-06-11T00:59:42+5:30
नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले.

खराब हवामानामुळे परत गेले हैदराबादचे विमान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले.
अलीकडे खराब हवामान आणि लेटलतिफीचा फटका विमान प्रवाशांना बसत आहे. सोमवारीसुद्धा असाच प्रकार घडला. हैदराबाद-नागपूर ६-ई-७०१२ हे विमान सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचले. या विमानाने हैदराबादवरून आपल्या नियोजित वेळेत उड्डाण केले. ते नागपुरात आलेही. परंतु नागपूरचे हवामान खराब असल्यामुळे त्याला विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली नाही. आकाशात बराच वेळ घिरट्या मारल्यानंतर ते विमान हैदराबादला परत गेले. ते विमान रात्री ९.१५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्याचप्रकारे एअर इंडियाचे मुंबईवरून येणारे विमानसुद्धा उशिरा पोहोचले. मुंबईवरूनच ते विमान उशिरा उडाले होते.