शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

चारित्र्यावर संशय; 'त्याने' झोपलेल्या बायकोच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 10:44 AM

नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये एका पतीने पत्नी मोबाईलवर मित्राशी गप्पा मारत असून त्यांच्यात काहीतरी असल्याच्या संशयावरुन ती झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर उकळतं तेल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर उकळतं तेल फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पीडित महिला ३५ टक्के भाजली असून तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दररोज कित्येक महिला घरगुती हिंसाचाराच्या घटनांना बळी पडतात. किरकोळ वाद, सासुरवास, चारित्र्यावर संशय अशा एक ना अनेक कारणांवरुन हिंसा केली जाते. नागपुरात एका पतीने पत्नी मोबाईलवर मित्राशी गप्पा मारत असून त्यांच्यात काहीतरी असल्याच्या संशयावरुन हे कृत्य केल्याचे कळते. ही घटना  पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये घडली असून सतीश भिमटे असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी सतीश हा पेंटींगचे काम करतो. त्याच्या घरी पत्नी भावना व दोन मुले आहेत. मागील चार महिन्यांपासून सतीश बेरोजगार आहे. तो घरीच असल्याने  चिडचिड करायचा. गेल्या काही दिवसांपासून सतीश आणि भावनामध्ये मोबाइलवर बोलण्यावरुन वाद होत होते. भावना आपल्या मित्राबरोबर मोबाईलवर बोलत राहायची हे सतीशला सहन होत नव्हते. तो तिच्यावर संशय घेऊ लागला व यातून त्यांची भाडणं होऊ लागली. गेल्या काही दिवसांपासून सतीश रागातच होता.

दरम्यान, पत्नी पहाटे पाच वाजता झोपली असताना सतीशने तेल गरम केले आणि ते उकळलेले तेल तिच्या चेहऱ्यावर फेकले. अचानक झालेल्या या प्रकाराने भावना भांभावून उठली व जोरजोरात ओरडू विव्हळू लागली. या घटनेत भावनाचा चेहरा गंभीररित्या भाजला गेला, तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. 

या घटनेप्रकरणी आरोपी सतीशविरोधात पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसा