नागपूरच्या बुटीबोरी या औद्योगिक परिसरात पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:07 IST2017-12-07T12:07:31+5:302017-12-07T12:07:55+5:30
नागपूरजवळच्या औद्योगिक परिसरात, बुटीबोरीत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

नागपूरच्या बुटीबोरी या औद्योगिक परिसरात पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून
ठळक मुद्देपती झाला फरार
नागपूर
आॅनलाईन लोकमत
नागपूरजवळच्या औद्योगिक परिसरात, बुटीबोरीत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. येथील जुनी वसाहत वॉर्ड क्र. १ मध्ये राहत असलेल्या मनीषा श्याम नारायण (२२) या महिलेचा तिचा पती श्याम नारायण याने गळा आवळून खून केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून या दांपत्याला तीन वर्षांची एक मुलगी आहे. खुनाचे कारण नेमके समोर आले नाही. (यासंबंधीचे सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.)