पत्नी विभक्त झाल्यामुळे पतीला घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:58 IST2021-02-05T04:58:04+5:302021-02-05T04:58:04+5:30
नागपूर : पत्नीने कायमची विभक्त होऊन दुसरे लग्न केल्यामुळे पहिल्या पतीला घटस्फोट मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

पत्नी विभक्त झाल्यामुळे पतीला घटस्फोट
नागपूर : पत्नीने कायमची विभक्त होऊन दुसरे लग्न केल्यामुळे पहिल्या पतीला घटस्फोट मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला.
अकोला येथील श्रीराम व कविता यांनी २० मे १९७८ रोजी लग्न केले होते. त्यानंतर ३१ मार्च १९८२ रोजी ते सहमतीने करार करून विभक्त झाले. कविताने ४ एप्रिल १९९१ रोजी दुसरे लग्न केले. दरम्यान, श्रीरामने कायदेशीर घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने श्रीराम व कविता कायदेशीररीत्या वेगळे झाले नसल्याचे आणि श्रीरामला स्वत:च्या चुकीचा फायदा घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवून ती याचिका खारीज केली. त्यामुळे श्रीरामने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून श्रीरामला घटस्फोट दिला. कविता विभक्ततेपासून श्रीरामकडे परत आली नाही, तसेच तिने दुसरे लग्न केले. त्यावरून तिची श्रीरामपासून विभक्त राहण्याची इच्छा स्पष्ट होते, असे हा निर्णय देताना नमूद करण्यात आले.