शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीची आत्महत्या; नागपूर जिल्ह्यातील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:19 IST

आमडी येथील घटना : हत्येचे कारण अस्पष्ट

रामटेक (नागपूर) : मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच खाेलीत गळफास लावून घेत स्वत:ला संपविले. ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमडी (ता. रामटेक) येथे गुरुवारी (दि. १६) मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी (दि. १७) सकाळी उघडकीस आली. आराेपी पतीने आत्महत्या केल्याने हत्येचे कारण कळू शकले नाही.

कुसुम मधुकर युवनाती (४३) असे मृत पत्नीचे तर मधुकर धोबा युवनाती (५३) असे मृत आराेपी पतीचे नाव आहे. दाेघेही सौंसर, जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, कामाच्या शाेधात रामटेक तालुक्यात आले हाेते. चैतराम भालचंद बसोले (रा. आमडी, ता. रामटेक) हे माेठे दुग्ध व्यावसायिक असून, त्यांच्या मुलाचे रामटेक शहरात दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे दुकान आहे. मधुकर त्यांच्याकडे गुराखी म्हणून वर्षभरापासून काम करायचा. शिवाय, ताे चैतराम बसोले यांच्या मालकीच्या एका छाेट्या खाेलीत एकटाच राहायचा.

मधुकरची विवाहित मुलगी (काेथुळणा, ता. सावनेर) येथे राहत असून, त्याचा मुलगा याच गावात राहायला आल्याने मधुकरची पत्नी कुसुम मुलाकडे काेथळणा येथे राहायची. ती गुरुवारी आमडी येथे आली हाेती. रात्री जेवण झाल्यानंतर त्या दाेघांमध्ये नेमके काेणत्या कारणावरून भांडण झाले, कुणालाही माहिती नाही. मधुकर शुक्रवारी सकाळी कामावर आला नसल्याने चैतराम त्याला बाेलवायला आले हाेते. बराच वेळ दार ठाेठावून आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दार ताेडले. त्याचवेळी त्यांना कुसुम रक्ताच्या थाराेळ्यात पडून तसेच मधुकर छताला लटकलेल्या आवस्थेत असल्याचे आढळून आले.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. उपविभागीय पोलिस अधिकारी अशित कांबळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

खाेलीतून कुऱ्हाड जप्त

मृत मधुकर युवनाती याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दाेघांनी शुक्रवारी रात्री हरभरा भाजून खाल्ला व रात्री साेबत जेवण केले हाेते. त्यानंतरचा घटनाक्रम कुणालाही माहिती नाही. मधुकरची खाेली गावाच्या टाेकावर असल्याने कुणाला ओरडण्याचा आवाजही ऐकायला आला नाही. खाेलीत रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आल्याने पाेलिसांनी ती जप्त केली. त्याने आधी खून व नंतर आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर