शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडोंच्या संख्येने हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली : कॅन्डल मार्चचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 21:14 IST

हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला.

ठळक मुद्देसर्व शाखीय कुणबी समाज संघटनेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. तिच्या जाण्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका अबलेवर असा क्रूर अत्याचार होणे ही समाजाला काळिमा फासणारी बाब आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला.महाल येथील अखिल कुणबी समाज भवन येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री परिणय फूके, कॉंग्रेस नेता गिरीश पांडव, माजी आमदार सुधाकर कोहळे, नगरसेविका मंगला खेकरे, रमेश शिंगारे, नरेंद्र जिचकार, राजेश काकडे, जिल्हा परिषद सदस्य अनिल निदान, अजय बोढारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पीडितेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मार्चला सुरुवात झाली. मार्चमध्ये सहभागी शेकडो कुणबी समाज बांधवांनी हातात मेणबत्ती घेऊन पीडितेच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली. कॅन्डल मार्च अखिल कुणबी समाज भवन, झेंडा चौक, कल्याणेश्वर मंदिर, महाल मार्गे गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. तेथे पीडितेला दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. कँडल मार्चमध्ये अखिल कुणबी समाजाचे पुरुषोत्तम शहाणे, माधव कडू, प्रल्हाद पडोळे, सुधीर शहाणे, अशोक कापसे, उदाराम फेंडर, बबन बोरकुटे, अनिल निधान, जयंत दळवी, राजेंद्र भोतमांगे, विनायक ठाकरे, राजेंद्र राऊत, राजाराम घोंगे, सरला देऊळकर, रमेश भोयर, राजेंद्र भेंडे, रमेश चिकटे, विनायक नागपुरे, अशोक वानखेडे, अल्का वांजेकर, विजय पवार, कमलेश ठवकर, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुरेश गुडधे, अशोक पांडव, वामन येवले, गणेश चेंबर, बावणे कुणबी समाज रामनगरचे दत्तात्रय निंबर्ते, बाबाराव तुमसरे, प्रदीप बुराडे, खैरे कुणबी समाज सुधारक संस्था जुनी शुक्रवारीचे चंद्रकांत नवघरे, विजय तेलंग, झाडे कुणबी समाजाचे राजेश चुटे, किशोर पटोले, मोरेश्वर पुंडे, तिरळे कुणबी समाज लालगंज झाडे चौक येथील वासुदेव कोंगे, सुरेश जिचकार, एकनाथ काळमेघ, जाधव कुणबी समाज व कल्याणकारी संस्थेचे राजेंद्र काकडे, सतीश सातंगे, संजय भोसे, झाडे कुणबी समाजाचे वामन उमरे, हरिभाऊ भोसे, महेंद्र देशमुख, खैरे कुणबी समाजाचे डॉ. वसंत भोयर, सुरेखा रडके, डॉ. प्रदीप महाजन, महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती अखिल कुणबी समाजाचे राजेंद्र तिजारे, बाळा शिंगणे, अनंता भारसागडे, तिरळे कुणबी सेवा मंडळाचे रमेश चोपडे, डॉ. रमेश गोरले, कृष्णा बोराटे, धनोजे कुणबी समाज सुयोगनगरचे दिनकर जीवतोडे, अशोक निखाडे, बबन वासाडे, कुणबी सेना टिंबरमार्ट लकडगंजचे सुरेश वर्षे, बाबाराव ढोबळे, गणेश कोहपरे, प्रगतिशील तिरळे कुणबी समाजाचे राजेश घोडमारे, महेंद्र ठाकरे, अभय आचार्य, खैरे कुणबी विकास परिवाराचे नितीन मालोदे, किशोर येडे, आशिष देवतळे, खैरे कुणबी बहुउद्देशीय विकास संस्थेचे गुनेश्वर आरेकर, हेमराज माले, सुनिल मगरे, जया देशमुख, कल्पना ठवरे, मीनाक्षी ठाकरे, गजानन रामेकर, शरद इंगोले, प्रा. शरद वानखेडे, किर्तीकुमार कडु, प्रमोद वैद्य, भास्कर पांडे, दुनेश्वर आरीकर, यांच्यासह कुणबी समाजातील शिक्षक संघटना, वकील संघटना आणि डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी कॅ न्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.आरोपीला फाशीची शिक्षा व्हावीहिंगणघाट येथील पीडितेवर झालेला हल्ला वेदनादायी आहे. या घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी आहे.’परिणय फुके, माजी राज्यमंत्री

टॅग्स :HinganghatहिंगणघाटDeathमृत्यूagitationआंदोलन