बीडचे उद्योजक कुटेंसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
By योगेश पांडे | Updated: November 10, 2023 20:32 IST2023-11-10T20:31:55+5:302023-11-10T20:32:03+5:30
कोराडी येथे पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला.

बीडचे उद्योजक कुटेंसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
नागपूर : बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी शुक्रवारी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
कोराडी येथे पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गजाननराव घुगे, यशवंत कुलकर्णी, राजेश शुक्ला, प्रिंस त्यागी, शिवाजीराव परसकर, नवनाथ प्रभाळे, शेख शेरू पटेल, बबनराव लवटे, दगडू कानडे, शिवाजी घरत, गणेश वाघमारे, बबन वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कुटे दांपत्याने बीड परिसरातील अनेकांना रोजगार दिला असून मागील काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत विविध चर्चा सुरू होत्या.