महाठग निनावेने घातला पावणेपाच कोटींचा गंडा
By Admin | Updated: November 9, 2016 02:57 IST2016-11-09T02:57:56+5:302016-11-09T02:57:56+5:30
देशाच्या अनेक प्रांतातील धान्य व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग प्रवीण निनावे याच्या बनवाबनवीचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे.

महाठग निनावेने घातला पावणेपाच कोटींचा गंडा
जोधपूरमध्ये गुन्हा दाखल : राजस्थान पोलिसांनी केली अटक
नागपूर : देशाच्या अनेक प्रांतातील धान्य व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग प्रवीण निनावे याच्या बनवाबनवीचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे. निनावेने राजस्थानमधील एका धान्य व्यापाऱ्याला स्वस्त भावाने साखर आणि धान्य देण्याची बतावणी करून पावणेपाच कोटींचा गंडा घातला. त्यामुळे राजस्थान पोलिसांनी मंगळवारी नागपुरात येऊन निनावेच्या मुसक्या बांधल्या.
बाजारभावापेक्षा मोठ्या फरकाने स्वस्त धान्य, साखर विकत देण्याचे आमिष दाखवून विविध प्रांतातील व्यापाऱ्यांना निनावे आपल्या जाळ्यात ओढतो. व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने मागणी केलेल्या एकूण मालापैकी सुरुवातीला काही रकमेच्या धान्याचा पुरवठा करतो. त्यानंतर दोन कोटींच्या वर व्यापाऱ्याकडून आॅर्डर आल्यानंतर निनावे त्याची रक्कम स्वत:च्या खात्यात वळती करून घेतो आणि नंतर त्याला टाळणे सुरू करतो. प्रारंभी बाजारपेठेत भाववाढ झाली, रोखे बाजारात पैसे अडकले, अशी बतावणी करून त्या व्यापाऱ्यांकडून
पोलिसांची निनावेवर मात
जोधपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोनवेळा पोलीस पथक येथे येऊन गेले. मात्र, आधीच माहिती मिळाल्याप्रमाणे निनावे पोलिसांना सापडत नव्हता. निनावेने त्याच्या कार्यालयापासून काही अंतरावर गुप्त कॅमेरे लावल्याचे आणि पोलिसांची भनक लागताच पळून जाण्याची आधीच व्यवस्था करून ठेवल्याचे ध्यानात येताच जोधपूर पोलिसांनी त्याच्यावर मात करण्याची योजना आखली. त्यानुसार, जोधपूर पोलिसांनी निनावेच्या निवासस्थानापासून खबरे पेरले. सोमवारी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक जैन आणि त्यांच्या बाऊंसरसह नागपुरात पोहचले. भल्या सकाळी या पथकाने निनावेच्या वर्धा मार्गावरील गजाजननगर, एफसीआय गोदामाच्या बाजूला असलेल्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात दबा धरला. तो कार्यालयात येऊन बसल्यानंतर काही वेळेतच पोलीस उपनिरीक्षक उमेशकुमार आणि त्यांचे चार सहकारी पोलीस तसेच जैन आणि त्यांचे एक डझनपेक्षा जास्त बाऊंसर निनावेच्या कार्यालयात धडकले. त्यांनी काही कळायच्या आतच निनावेच्या मुसक्या बांधल्या. त्याचा मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राहुल जैन ऊर्फ खाबियालासुद्धा ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात नेले. तेथे पोलीस निरीक्षक राजन माने यांच्यासमोर निनावे आणि खाबियाची कागदोपत्री अटक दाखवली अन् हे पथक राजस्थानकडे निघून गेले.