शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भजन, संगीतामुळे मानवाचे जीवन प्रभावशाली

By admin | Updated: June 20, 2016 02:51 IST

भजन, संगीतातून मनाला आनंद मिळून मन प्रसन्न होते. परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळालेला आनंद इतर आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो.

नितीन गडकरी : ‘अर्पितो गुरुवंदना’ सीडीचा लोकार्पण समारंभनागपूर : भजन, संगीतातून मनाला आनंद मिळून मन प्रसन्न होते. परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळालेला आनंद इतर आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. त्यामुळे भजन, संगीताचा प्रभाव माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर पडून त्याचे जीवन प्रभावशाली होते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबागतर्फे संतकवी कमलासुत रचित ‘अर्पितो गुरुवंदना’ सिडीच्या लोकार्पण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, सिने संगीतकार नंदू होनप, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, शिक्षक आमदार ना. गो. गाणार, सामाजिक कार्यकर्ता रवी पुट्टेवार उपस्थित होते. गडकरी म्हणाले, चंद्रशेखर वराडपांडे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. लोक मंदिराचे घर करतात, परंतु त्यांनी घराचे मंदिर केले. त्यांचे दर्शन झाल्यावर गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचा भास होत असे. ईश्वराची भक्ती करताना शोषित, पीडित, अंध, अपंगांची सेवा करताना मोठा आनंद मिळतो. कमलासुतांचे जीवन गजाननमय झाले होते. त्यांनी सातत्याने भक्तगणांना प्रेरणा दिली. त्यांच्या जीवनात संवेदनशीलता, भक्ती होती. त्यामुळे माणुस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनुराधा पौडवाल यांनी गजानन महाराज,संतकवी कमलासुतांवर श्रद्धा असल्याचे सांगून सीडी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिने संगीतकार नंदू होनप म्हणाले, कमलासुतांसारखे गुरु लाभण्यासाठी भाग्य लागते. सद्गुरुच्या कार्यात आत्मिक समाधान असते. गजानन महाराजांवरील सिडी ऐकण्याची नसून अनुभवण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश वराडपांडे यांनी चंद्रशेखर वराडपांडे ऊर्फ संतकवी कमलासुत यांच्या आठवणींना उजाळा दिला. आभार डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला गजानन महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मंदिर परिसर स्वच्छ असावाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदेशातील मंदिरांचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याचे सांगून तेथील मंदिराकडे जाणारे रस्ते अतिशय चांगले असतात. परंतु भारतात मंदिराचा परिसर अस्वच्छ असतो. रस्ते व्यवस्थित नसतात. त्यामुळे प्रत्येक गावातील मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्व धर्माच्या नागरिकांची तीर्थस्थळे जोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांचे काम करण्यात येत असल्याचे सांगून २५ हजार कोटी रुपये खर्च करून विविध धार्मिक स्थळांकडे जाणारा पालखी मार्ग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.