शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘आब नही तो कब नही’ : अन्यायग्रस्त आदिवासींचा विधान भवनावर विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:29 IST

राष्ट्रीय आदिम कृती समितीने हजारोंच्या संख्येने विधान भवनावर विराट मोर्चा काढला. ‘आब नही त कब नही’चा नारा देत आपला आवाज बुलंद केला.

ठळक मुद्दे ४० वर्षांपासून अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांची हक्काची लढाई अनुसूचित जमातीतील अर्जदारांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे : मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : मागील ४० वर्षांपासून अन्यायग्रस्त आदिवासी बांधव आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजपर्यंत त्यांना आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. भाजप सरकारने सत्तेवर आल्यास त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासींनी मतदान करून भाजपला सत्तेत बसविले. परंतु तीन वर्षे होऊनही भाजप सरकारने अन्यायग्रस्त आदिवासींच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आदिम कृती समितीच्यावतीने हजारोंच्या संख्येने विधान भवनावर विराट मोर्चा काढला. ‘आब नही त कब नही’चा नारा देत आपला आवाज बुलंद केला. पुढील आठवड्यात अन्यायग्रस्त आदिवासींच्या प्रश्नांबाबत बैठक बोलविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.हलबा, हलबी, माना, गोवारी, कोळी, धोबा, धनगर, छत्री, ठाकूर, मन्नेवारलु आदी ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींना आजपर्यंत राजकीय पक्षांकडून आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. भाजप सरकारनेही सत्तेवर आल्यानंतर अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरले. त्यामुळे संतप्त अन्यायग्रस्त आदिवासींनी हजारोंच्या संख्येने विधान भवनावर धडक दिली. अनुसूचित जमातीतील अर्जदारांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, प्रमाणपत्रासाठी कमीतकमी कागदपत्र म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जातीची नोंद, प्रतिज्ञापत्र, १५ वर्षाचा अधिवास पुरावा यांची निश्चिती करावी, राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणात आणाव्या, वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून ३० दिवसाची कालमर्यादा निश्चित करावी, आदी मागण्या अन्यायग्रस्त आदिवासींनी रेटून धरल्या. मोर्चात आदिमच्या नेत्या अ‍ॅड नंदा पराते यांनी ही लढाई येथेच थांबणार नसून न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचे मत व्यक्त केले. आमदार विकास कुंभारे यांनी वर्षभरात अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय न मिळाल्यास आमदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मन्नेवार आदिवासी समाजाच्या लक्ष्मी हजारे, राजू धकाते, विश्वनाथ आसई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आमदार विकास कुंभारे, अ‍ॅड. नंदा पराते, विश्वनाथ आसई, धनंजय धापोडकर, दे. बा. नांदकर, प्रवीण भिसीकर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनोहर घोराटकर, रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अन्यायग्रस्त आदिवासींच्या प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात बैठक बोलावण्याचे तसेच नोकरीतून कुणालाही न काढण्याचे आणि आदिवासींच्या वैधता प्रमाणपत्रासाठी जीआर काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला.मंत्री जानकर, खासदार महात्मे मोर्चाबाहेरअन्यायग्रस्त आदिवासींच्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे मोर्चास्थळी आले होते. खासदार विकास महात्मे यांनी अन्यायग्रस्त आदिवासींचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. तर मंत्री महादेव जानकर यांनी अन्यायग्रस्त आदिवासींना भावनिक मुद्दा न करता कायद्याने लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले. येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत तुम्हाला न्याय मिळेल, असे शब्द त्यांनी उच्चारताच संतप्त मोर्चेकऱ्यांनी त्यांना गप्प राहण्यास सांगून त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. मंत्री महोदयांना मोर्चाबाहेर काढा, असा एकच कल्लोळ झाला. मोर्चेकऱ्यांच्या संतप्त भावना पाहून दोघांनीही मोर्चातून काढता पाय घेतला.पोलिसांनी घेतली होती धास्तीअन्यायग्रस्त आदिवासींचा विराट मोर्चा पाहून पोलिसांनीही या मोर्चाची धास्ती घेतली होती. जवळपास १५० सशस्त्र आणि साधे पोलीस मोर्चास्थळी तैनात करण्यात आले होते. परंतु मोर्चातील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी भेटून आल्यानंतर शांततेच्या मार्गाने हा मोर्चा परत घेण्यात आला. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांची मोर्चेकऱ्यांशी हुज्जतबाजीहजारोंच्या संख्येने आलेले अन्यायग्रस्त आदिवासी शांततेच्या मार्गाने मोर्चात सहभागी झाले होते. परंतु टेकडी मार्गावर एका पोलीस तुकडीची कमान सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक नीलेश उरकुडे हे मोर्चेकऱ्यांशी उर्मटपणे व्यवहार करून हुज्जत घालत होते. ते मोर्चेकऱ्यांना मोर्चास्थळी जाण्यास मज्जाव घालत असल्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर