नागपुरात ‘नाटा’च्या परीक्षेत प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 09:08 PM2020-08-29T21:08:20+5:302020-08-29T21:33:04+5:30

नॅशनल अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर (नाटा) ची ऑनलाईन परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी आणि ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेत प्रचंड गोेंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

Huge confusion in ‘Nata’ exams in Nagpur | नागपुरात ‘नाटा’च्या परीक्षेत प्रचंड गोंधळ

नागपुरात ‘नाटा’च्या परीक्षेत प्रचंड गोंधळ

Next
ठळक मुद्दे तांत्रिक अडचणीबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचाही उडाला फज्जा : विद्यार्थ्यांना झाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॅशनल अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर (नाटा) ची ऑनलाईन परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी आणि ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेत प्रचंड गोेंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
गोधनी रेल्वे येथील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ आणि सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी या दोन केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एका एका केंद्रावर जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. मुळात या परीक्षेसाठी दोन ऑप्शन देण्यात आले होते. मुलांनी घरून इंटरनेटची अडचण येऊ नये म्हणून सेंटरवर परीक्षा देण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शनिवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठी पोहचले. पण या केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कॉलेजकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. मुले स्वत:चे सॅनिटायझर घेऊन आले होते. मुलांची उपस्थिती पेपर संपल्यानंतर घेण्यात आली. दुपारी २.३० वाजता पेपर संपलेला असताना मुलांना थांबवून ठेवण्यात आले. अखेर काही पालकांनी जाब विचारीत व्हिडीओ शूटिंग सुरू केल्यानंतर दुपारी ३.३० ते ४ वाजता सोडण्यात आले. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथच्या पेपरसाठी रफ शीट देण्यात येणार होती. पेपर सुरू होऊन १० मिनिटे होऊन गेल्यानंतरही कॉलेज व्यवस्थापनाने रफ शीट दिलेली नव्हती, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘नाटा’च्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे अनेकांनी प्रश्नांवर क्लिक केल्यावरही उत्तर सबमिट होत नव्हते, अशा तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या. अनेक प्रश्न काही न करता सबमिट झाल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप झाला. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षकांना विचारणा केली असता, त्यांनी हात वर केले. नाटाच्या पेपरचे एकूण दोन भाग होते. एका एका भागानंतर विद्यार्थ्यांना तीन मिनिटांचा ब्रेक होता. मात्र, गोंधळामुळे यात २० मिनिटे वाया गेली.

Web Title: Huge confusion in ‘Nata’ exams in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा