नागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:26 IST2020-05-28T21:23:51+5:302020-05-28T21:26:50+5:30

महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने मंगळवारी झोनमधील कुशीनर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

Howrahpeth , HUDCO ST Quarter Complex in Nagpur Seal | नागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील

नागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने मंगळवारी झोनमधील कुशीनर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

हावरापेठ प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिम-मधुकर तळेकर यांचे घर (हावरापेठ मुख्य रस्ता)
उत्तर पूर्वेस -रमेश मेहर यांचे घर (हावरापेठ मुख्य रस्ता)
दक्षिणपश्चिम -ओमप्रकाश भक्ते यांचे घर, रिंगरोड
दक्षिणपूर्वेस-साई प्रकल्प, रिंगरोड

हुडको एसटी क्वॉर्टर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस -फुटपाथवरील दर्गाह
पश्चिम - एसटी क्वॉर्टर
दक्षिणपूर्वेस -एसटी स्टॅण्ड कॉर्नर
उत्तरपूर्वेस -मुरारका मार्ग

कुशीनगर येथील कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्र
दक्षिणपूर्वेस -मुन्नारे यांचे घर
दक्षिणपश्चिम - नरेश तुमाने यांचे घर
उत्तरपश्चिमेस -महादेव धमगाये यांचे घर
उत्तरेस-हेमराज बडोले यांचे घर

Web Title: Howrahpeth , HUDCO ST Quarter Complex in Nagpur Seal