शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

अशी घेता येईल तुमच्या घरातील दिव्यांगजनांची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 4:41 PM

आपल्या घरातील व जवळपास असलेल्या दिव्यांगजनांची लॉकडाऊनच्या काळात कशी काळजी घेता येईल व त्यांचे मनोस्वास्थ्य अधिक चांगले कसे राखता येईल याचाच विचार त्यांचे पालक करत असतात. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या व उपयुक्त योजना वा कृती पुढीलप्रमाणे सुचविता येऊ शकतात.

ठळक मुद्देसंयुक्तिक क्षेत्रीय कौशल्यविकास, पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्राने लॉकडाऊन काळात दिव्यांगजनांसाठी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड १९ विषाणूच्या संक्रमण काळात शासनाने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे सर्वत्र शाळा महाविद्यालय विद्यापीठ व इतर शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था बंद ठेवल्या आहेत. सामान्य मुलांसोबतच दिव्यांगजन मुलेही घरात अडकून पडलेली दिसत आहेत. जिथे सामान्यजनच कोंडीत अडकल्यासारखे झाले आहेत तिथे दिव्यांगजनांबाबत काय बोलायचे.. त्यांच्यासाठी हा काळ तर अधिकच कठीण असा होतो आहे.आपल्या घरातील व जवळपास असलेल्या दिव्यांगजनांची लॉकडाऊनच्या काळात कशी काळजी घेता येईल व त्यांचे मनोस्वास्थ्य अधिक चांगले कसे राखता येईल याचाच विचार त्यांचे पालक करत असतात. अशा पालकांसाठी काही महत्त्वाच्या व उपयुक्त योजना वा कृती पुढीलप्रमाणे सुचविता येऊ शकतात.लॉकडाऊनमुळे दिव्यांगजनांच्या दैनंदिन जीवनात फार मोठा परिणाम होतो. यामुळे एकाकीपण नैराश्य उदासीनता चिंता आणि भीती मानसिक ताण-तणाव निर्माण होऊन गंभीर परिणाम होऊ शकतात. दिव्यांगजनांकडे सामान्यांच्या तुलनेत फावला किंवा रिकामा वेळ जास्त असतो. या वेळेचा जर छंद आणि मनोरंजनासाठी उपयोग केल्यास अनावश्यक परिस्थितीमुळे निर्माण झालेला मानसिक ताण कमी होऊन सुदृढ मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते.यासाठी लॉकडाऊन काळात दिव्यांगजनांना कार्यमग्न ठेवणे गरजेचे आहे. मनोरंजन क्रियेचा थेरपी म्हणून उपयोग करणे गरजेचे आहे. या वेळामध्ये दैनंदिन कामकाजात व्यतिरिक्त मिळणारा वेळ असतो. पालकांनी पुढील खेळांसाठी वा कार्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे.यात घरात राहून खेळावयाचे खेळ मोडतात. जसे, मुलांना विविध प्राणी व फळांच्या कृती पुस्तिका तयार करता येतील. त्याचसोबत ठोकळे वा ब्लॉक्सचा वापर करून इमारती बनवणे वा वस्तू बनवता येतील. यासाठी घरगुती वस्तूंचाही वापर केला जाऊ शकतो. जसे, प्लास्टिकचे रिकामे डबे, रिकामी खोकी आदी. यानंतर कार गेम्स, पझल्स, शब्दकोडी, अंताक्षरी, भेंड्या खेळणे आदी खेळांतही त्यांना सामील करता येऊ शकते. यातून त्यांच्यातील सामाजिकता व मानसिकता मजबूत होईल. कधी सापशिडी, कॅरम, व्यापार आदी बुद्धीला चालना देणारे खेळ खेळले जाऊ शकतात. त्यातून मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळू शकेल. मुलांना सतत टीव्ही समोर बसू देणे चुकीचे ठरते. त्यांना जुनी मासिके, वर्तमानपत्रे यातील गोष्टी वाचायला द्याव्यात. आपण स्वत:ही त्यांच्यासोबत त्याचे वाचन करावे. त्यांना लहान मुलांचे कॉमिक्स, कथा कविता वाचायला देता येतील.सुटीच्या काळात मुलांमधील सृजनशीलता वाढवण्यासाठी त्यांना रोजच्या घरगुती कामात सामील करून घ्यावे. घरातील स्वच्छता, स्वयंपाक किंवा अन्य आवराआवर यात त्यांची मदत घ्यावी. यातून त्यांच्यातील हस्तकौशल्य सुधारेल व त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागेल. त्यांना लहानसहान कामे स्वतंत्ररित्या करू द्यावीत. जसे, सरबत बनवणे, चहा बनवणे, झाडांना पाणी देणे आदी. यासाठी त्यांचे एक वेळापत्रकही बनवता येऊ शकते. या वेळापत्रकानुसार त्यांचा दिनक्रम राहिला तर त्यांनाही ते एक आव्हान वाटेल व दिवस कंटाळवाणा होणार नाही. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य