शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषधे कशी कळणार? राज्यात औषध तपासणी निरीक्षकांची तब्बल ७८ टक्के पदे रिक्त

By सुमेध वाघमार | Updated: October 7, 2025 17:26 IST

Nagpur : या गंभीर मनुष्यबळ तुटवड्यामुळे सरकारी आणि खासगी औषध दुकानांची व औषधांची नियमित तपासणी होत नाही, परिणामी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका बाजूला मध्य प्रदेशातील ९ बालकांचा 'डायएथिलीन ग्लायकॉल' नावाच्या विषारी घटकामुळे जीव गेला असताना आणि नागपुरात भेसळयुक्त औषधींची दोन मोठी प्रकरणे उघडकीस आली असताना, राज्यात औषध नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनांतर्गत (एफडीए) औषध निरीक्षकांची तब्बल ७८ टक्के पदे रिक्त आहेत. या गंभीर मनुष्यबळ तुटवड्यामुळे सरकारी आणि खासगी औषध दुकानांची व औषधांची नियमित तपासणी होत नाही, परिणामी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नागपूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या औषध भांडारात अँटिबायोटिक असलेल्या 'रेसीफ-५००' या गोळ्यांमध्ये महत्त्वाचा घटक 'सिप्रोफ्लोक्सासिन' आढळलाच नाही. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. या घटनेपाठोपाठ मेडिकलच्या औषध भांडारात 'रिक्लॅव्ह ६२५' हे अँटिबायोटिक औषध बनावट आढळल्याने मोठी खळबळ माजली. धक्कादायक बाब म्हणजे, औषध बनावट असल्याचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच जवळपास ७७ हजार बनावट गोळ्या रुग्णांना वाटण्यात आल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले, पदे रिक्त असल्याने आवश्यकतेनुसार औषधी तपासणी होत नसल्याने या प्रकरणांची व्याप्ती मोठी असण्याची भीती आहे. 

तीनच प्रयोगशाळा, अहवालाला दीड महिना!

रिकाम्या जागांसोबतच, भेसळयुक्त औषधे तपासणीसाठी राज्यात केवळ नागपूर, नाशिक आणि पुणे या तीनच ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. संपूर्ण राज्याच्या औषधींचा भार या तीन प्रयोगशाळांवर असल्याने तपासणी अहवाल यायला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. यामुळे विषारी कफ सिरपसारख्या औषधींचे वितरण होईपर्यंत रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे.

२०० पैकी ४५ जागा भरलेल्या

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनांतर्गत औषध निरीक्षकांच्या २०० जागा मंजूर आहेत. यातील ४५ जागा भरलेल्या असून, तब्बल १५५ जागा आजही रिक्त आहेत. २०१२ पासून भरती प्रक्रियाच बंद असल्याची माहिती आहे.

लवकरच १०९ पदे भरणार

"औषधी निरीक्षकांची १०९ पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात आली असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. राज्यात आणखी दोन प्रयोगशाळांची भर पडणार असून, त्यांची एकूण संख्या पाच होईल. औषध निरीक्षकांच्या मंजूर पदांमध्ये ७५ पदे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे."-डी. आर. गहाणे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Faces Critical Drug Inspector Shortage Amidst Adulteration Concerns

Web Summary : Maharashtra's drug control is crippled with 78% drug inspector posts vacant. Adulterated drugs found in Nagpur raise health concerns. With only three labs, testing delays endanger patients. 109 new posts will be filled soon, says FDA.
टॅग्स :Drugsअमली पदार्थmedicinesऔषधंnagpurनागपूरGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र