पेट्रोल दरवाढीने अच्छे दिन कसे येणार ? पेट्रोल, गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:40 IST2017-09-26T16:40:43+5:302017-09-26T16:40:49+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली.

पेट्रोल दरवाढीने अच्छे दिन कसे येणार ? पेट्रोल, गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध
नागपूर,दि. २६ - गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने केली.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन केले. दरवाढीसाठी केंद्र सरकारचा निषेध करणारे, तसेच कर लादून राज्य सरकारने केलेली वाढ या विरोधात पोस्टर्स झळकविण्यात आले. महाराष्ट्रात विविध प्रकारचे कर आकारले जात आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत इंधनाच्या दरात ११ रुपयांनी वाढ झालेली आहे. राज्य सरकारने लावलेले कर परत घ्यावे, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली.