कशी होणार मनपाची कर वसुली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:18+5:302020-12-15T04:26:18+5:30
गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. मागील काही वर्षांत नवीन ...

कशी होणार मनपाची कर वसुली?
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. मागील काही वर्षांत नवीन पदभरती झालेली नाही. सद्यस्थितीत मनपात ३५ टक्के पदे म्हणजेच ५,२५३ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत कर वसुली कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम मनपाच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. दुसरीकडे भरती बंद असल्याने बेराेजगार युवकांना संधी नाकारली जात आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, १ डिसेंबर २०२० रोजी मनपामध्ये वर्ग १ ते ४ व सफाई मजूर अशी एकूण १५ हजार ९४३ पदे मंजूर आहेत. यापैकी १० हजार ९०८ पदे भरलेली असून, ५ हजार २५३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदाची टक्केवारी ३५ टक्क्याच्या आसपास आहे.
वर्ग १ मधील २१४ पदापैकी १०३ पदे भरलेली असून, १११ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची ७७ पदे मंजूर असून, २३ पदे भरलेली असून, ५४ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ ची ३ हजार ७९१ पदे मंजूर असून, १ हजार ७३५ पदे भरलेली आहेत. तर २ हजार ५६ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची २ हजार ७५४ पदे मंजूर असून, ८८२ पदे भरलेली आहेत. तर १ हजार ८७२ पदे खाली आहेत. सफाई मजुरांची ३ हजार ९४५ पदे मंजूर असून, ३ हजार ८६३ पदे भरलेली आहेत, तर ८२ पदे रिक्त आहेत.
...
सहा वर्षात दोन हजार सेवानिवृत्त
२०१४ ते नोव्हेंबर २०२० या सहा वर्षांच्या कालावधीत मनपातील जवळपास दोन हजार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना काही अटी व शर्तीच्या अधीन संधी देण्यात आली. परंतु ही संख्या २०० हून अधिक नाही.