बिनाजाळीच्या सफारी जिप्सी खरेच किती सुरक्षित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:49+5:302020-12-15T04:26:49+5:30
नागपूर : सध्या वन पर्यटन आणि व्याघ्रदर्शनासाठी पैसे मोजून जंगल सफारी करण्याची मोठी क्रेझ आली आहे. मात्र जंगलामध्ये थेट ...

बिनाजाळीच्या सफारी जिप्सी खरेच किती सुरक्षित?
नागपूर : सध्या वन पर्यटन आणि व्याघ्रदर्शनासाठी पैसे मोजून जंगल सफारी करण्याची मोठी क्रेझ आली आहे. मात्र जंगलामध्ये थेट वाघांच्या अधिवासात फिरणाऱ्या बिना जाळीच्या जिप्सी खरोखरच सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला आहे. पर्यटकांच्या जिप्सीवर वाघ हल्ला करतोय, अशी एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरायला लागला आहे.
लहान मुले, महिला आणि पुरुष असलेली एका पर्यटकांची जिप्सी वाघ दडून असलेल्या अगदी झुडपाजवळ थांबून त्याला पाहण्यासाठी प्रतीक्षेत असते. एवढ्यात झुडपातून आलेला वाघ थेट त्यांच्यावर झेप घेण्याच्या पावित्र्यात येतो. प्रसंगावधान दाखवून ‘हाट’, ‘हाट’ असा आवाज करून सारेजण वाघाला पळवून लावतात, जिप्सीही पुढे निघते, असा हा जीवावर बेतणाऱ्या प्रसंगाचा व्हिडिओ आहे. या घटनेमुळे आता अनेक प्रश्न पुन्हा एरणीवर येऊ पाहत आहेत. व्याघ्रपर्यटनात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना नव्हे. दोन दिवसांपूर्वीच्या एका घटनेत जिप्सीचालकाने चक्क वाघाच्या मागेमागे जिप्सी चालवत नेल्याचा प्रकार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडला आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये वाघ जिप्सीचा पाठलाग करीत असल्याचे दिसले होते. वाघ कुठे आहे, याची माहिती गाईडला असते. अशा वेळी संपूर्ण खबरदारी घेऊनच जिप्सी किती अंतरावर व कुठे थांबवावी, याची सूचना गाईडने चालकाला द्यायला हवी. मात्र उत्साहाच्या भरात आणि फोटो घेण्याच्या नादात त्याकडे दुर्लक्ष होते.
...
गाईड-जिप्सीचालकही जबाबदार
अनेक घटनांमध्ये गाईड आणि जिप्सीचालकही जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. पर्यटनकाळात सुरक्षेची बाजू सांभाळणारे हे दोन महत्त्वाचे घटक असतात. मात्र हौसी पर्यटकांना आवरण्यात ते बरेचदा कमी पडतात. काही प्रसंगांमध्ये तर खुद्द जिप्सीचालकच अधिक उत्साहात असल्याचे सांगितले जाते.
...
खुली जिप्सी कशासाठी?
वन पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खुली जिप्सी अनेकांना हवी असते. मात्र व्याघ्र पर्यटनात जाळीदार जिप्सी वापरण्याऐवजी खुली जिप्सी कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मागील काळात घडलेल्या घटना पाहू जाता सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने यावर विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
...