शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

३१ जानेवारीची ‘डेडलाईन’ कशी गाठणार ?

By admin | Updated: January 24, 2016 02:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल ३१ जानेवारीपर्यंत घोषित करण्यात येतील असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

नागपूर विद्यापीठ : परीक्षा विभागासमोर मोठे आव्हाननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल ३१ जानेवारीपर्यंत घोषित करण्यात येतील असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु निकालांचा सध्याचा वेग लक्षात घेता हा दावा पूर्ण करणे हे परीक्षा विभागासमोरील मोठे आव्हानच राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २०६ निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे ८ दिवसांत ४०० हून अधिक निकाल लागणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु अनेक परीक्षा आटोपून ४५ दिवस उलटून गेले असूनदेखील विद्यार्थ्यांना निकालांची प्रतीक्षाच आहे. अनेक परीक्षांचे निकाल हे ‘डेटा ट्रान्सफर’मध्ये अडथळे आल्यामुळे खोळंबले होते. बहि:शाल विद्यार्थी, तसेच अगोदर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य तऱ्हेने विद्यापीठापर्यंत पोहोचली नाही. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे नामांकन क्रमांक भरले होते. त्यामुळे निकालाशी संबंधित ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक ‘एरर’ दाखविण्यात येत होता.ही अडचण दूर झाल्यानंतर निकालांचा वेग काही प्रमाणात वाढला असला तरी अनेक निकाल प्रलंबित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २०६ निकाल जाहीर झाले आहेत. परंतु प्रत्यक्ष संकेतस्थळावर मात्र १५१ निकालांचीच यादी दर्शविण्यात येत आहे. (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे निकाल लागणारअभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे निकाल ही विद्यापीठासाठी नेहमीचीच डोकेदुखी असते. यंदा अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येत आहे. परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेतली होती. यानंतर मूल्यांकनाचा वेग वाढला होता. अभियांत्रिकीचे निकाल या आठवड्यात लागण्यास सुुरुवात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.