शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मांडाचे कोडे आपल्याला कितपत उलगडले आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 09:47 IST

संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनागपुरात ब्रह्मांड परिषदेचे आयोजनविश्वाचे कोडे उलगडले हा गैरसमज दूर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रह्मांड निर्मिती आणि त्यातील तथ्यांचे कोडे आपल्याला समजले आहे, हा गैरसमज अनेक संशोधकांना आहे. मात्र प्रत्यक्षात ब्रह्मांडावर संशोधन करणारे बहुतांश संशोधक हे एकाच मार्गावर चालत आहेत. महास्फोटाची संकल्पना चुकीची असेल या शक्यतेकडे संशोधकांचे दुर्लक्ष झाले. संशोधकांनी एकांगी विचार सोडण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिक विश्वासंदर्भात २६ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेअगोदर ‘ब्रह्मांडाचे कोडे आपल्याला कितपत उलगडले आहे’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. नारळीकर रविवारी बोलत होते.गांधीसागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘सिरी’चे अध्यक्ष आ. अनिल सोले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमरकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे,‘जेएनपीटी’चे राजेश बागडी प्रामुख्याने उपस्थित होते. ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली यासारख्या प्रश्नांचे आकर्षण मनुष्याला नेहमीच राहिले आहे. याबाबत विविध तर्क मांडण्यात आले. पुस्तके लिहिण्यात आली. परंतु लेखकांनी आपल्याला सर्वच समजले आहे, या आविर्भावात पुस्तके लिहिली आहेत. पायथागोरसने पृथ्वी सूर्य नव्हे तर वेगळ्याच अग्निकुंडाभोवती प्रदक्षिणा घालते व सोबत प्रतिपृथ्वीदेखील आहे, असे विधान केले होते. त्यानंतर फ्रीडमन व लेमात्रे यांनी ब्रह्मांडाच्या संकल्पना मांडल्या व हबल आणि ह्युमॅसन यांच्या संशोधनाची त्याला जोड मिळाली. परंतु १९७० नंतर निरीक्षणांचा कोणताही आधार नसलेल्या अग्राह्य कल्पनांचे पीकच विश्वोत्पत्ती शास्त्रात आले आहे. ‘बिगबँग’ म्हणजेच महास्फोटाच्या वेळी नेमके काय घडले असावे, यासंदर्भात अनेक जण कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्या घेत आहेत,असे डॉ.नारळीकर म्हणाले. जी वस्तू स्वयंप्रकाशित किंवा परप्रकाशित नाही, ती आपल्याला दिसत नाही. ब्रह्मांडात अशा अनेक अदृश्य वस्तू असणारच. परंतु या वस्तू नेमक्या काय आहेत, याबाबत कुणालाच काही सांगता आलेले नाही. मायक्रोवेव्ह तरंगाच्या बाबतीतदेखील असेच घडले. विश्वोपत्ती शास्त्रातील ब्रेन, फँडम फिल्ड्स, अदृश्य वस्तू इत्यादी गृहितांना कुठलाही प्रायोगिक आधार नाही. त्यामुळेच आधुनिक व प्राचीन काळातील कल्पनांमध्ये अवास्तवतेचे साम्य आहे, असेदेखील डॉ. नारळीकर यांनी प्रतिपादन केले. ‘सिरी’चे संचालक डॉ.संजय वाघ यांनी संचालन केले.

 

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकर