शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

नागपूर शहरात महिला अत्याचारांचे नेमके आकडे तरी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 10:38 IST

२०१७ साली नागपूर शहरात महिलांवर नेमके किती अत्याचार झाले यासंदर्भातील वेगवेगळे आकडे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देएकाच वर्षातील दाखल गुन्ह्यांची वेगवेगळी माहिती ‘एनसीआरबी’ व ‘आरटीआय’मधील माहितीत विसंगती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) माध्यमातून देश तसेच महत्त्वाच्या शहरांतील गुन्ह्यांची आकडेवारी जारी करण्यात येते. सर्वसाधारणत: पोलीस विभागाकडून माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहिती व ‘एनसीआरबी’ची आकडेवारी सारखी असणे अपेक्षित आहे. परंतु २०१७ साली नागपूर शहरात महिलांवर नेमके किती अत्याचार झाले यासंदर्भातील वेगवेगळे आकडे दिसून येत आहेत. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या आकडेवारीपेक्षा ‘एनसीआरबी’तील आकडेवारी ही दुपटीहून अधिक कमी आहे. त्यामुळे महिला अत्याचारांचे नेमके आकडे तरी किती असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘एनसीआरबी’ने काही दिवसांअगोदर २०१७ साली झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा अहवाल जारी केला. यानुसार नागपुरात २०१७ साली महिला अत्याचाराच्या एकूण ७२ प्रकरणांची नोंद झाली. दुसरीकडे उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना २१ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून माहिती प्राप्त झाली होती. या अधिकृत माहितीनुसार २०१७ साली शहरात महिला अत्याचाराच्या १६६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. ‘एनसीआरबी’ व माहिती अधिकारातील आकडेवारीत ९४ गुन्ह्यांची तफावत आढळून येत आहे. हा आकडा निश्चितच लहान नाही. अशा स्थितीत नेमकी खरी आकडेवारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘सायबर’ गुन्ह्यांच्या आकडेवारीतदेखील फरक२०१७ साली नागपुरात ‘सायबर क्राईम’चे ८२ गुन्हे नोंदविण्यात आले असे ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीतून समोर येत आहे. परंतु नागपूर पोलिसांनी २२ आॅगस्ट २०१९ रोजी माहिती अधिकारातून दिलेल्या माहितीनुसार ही संख्या ८१ इतकी होती. याशिवाय २०१६ च्या आकडेवारीतदेखील फरक दिसून येत आहे. आकड्यांमध्ये फारसा फरक नसला तरी ‘एनसीआरबी’ व नागपूर पोलिसांची आकडेवारी सारखी असणे अपेक्षित आहे. आकडेवारीत ही तफावत अनेक प्रश्न उत्पन्न करणारी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी