दूध उत्पादन कसे वाढणार ?
By Admin | Updated: December 10, 2014 00:42 IST2014-12-10T00:42:15+5:302014-12-10T00:42:15+5:30
संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधारासाठी जोडधंदा म्हणून गाई-म्हशी पाळण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. परंतु या योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या पशुसंवर्धन

दूध उत्पादन कसे वाढणार ?
पशुसंवर्धन विभागाला सहआयुक्त नाही : डॉक्टरविना १२२ दवाखाने
गणेश हूड - नागपूर
संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधारासाठी जोडधंदा म्हणून गाई-म्हशी पाळण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. परंतु या योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या पशुसंवर्धन विभागाला पूर्णवेळ प्रादेशिक सहआयुक्त नाही. १२२ पशुवैद्यकीय दवाखान्यांना पशुधन विकास अधिकारी नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादन कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील दूध उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या पशुसंवर्धन विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. विभागाची जबाबदारी असलेले प्रादेशिक सहआयुक्त पद रिक्त आहे. उपायुक्त डॉ. जे.एस. सोनबरसे ही जबाबदारी सांभाळत आहेत. सहापैकी तीन उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. त्यातच दोन उपायुक्त पुढील दोन महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे एकच उपायुक्त कार्यरत राहतील. ४६ सहायक आयुक्तांपैकी १२, पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या ४०६ पैकी १२२ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ व ४ च्या १०११ पैकी १४२ पदे रिक्त आहेत. तसेच पशुधन पर्यवेक्षकांची ४०० पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात मागील १२ वर्षांत पदभरती झालेली नाही. त्यातच दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे. (प्रतिनिधी)
योजनांचे नियोजन नाही
विभागाला प्रादेशिक सहआयुक्त नाही. त्यातच उपायुक्त व सहायक आयुक्तांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विभागामार्फन राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नियोजन नाही. तालुका ते प्रदेश पातळीवर समन्वय विस्कळीत झाला आहे. तांत्रिक कामे ठप्प असल्याचे चित्र आहे.