शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत काडतुसे रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात गेले कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:37 IST

इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विभागात ही काडतुसे गेले कसे, याची विचारणा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस अधीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहायक सुरक्षा आयुक्तांनी मंगळवारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक, सहायक सुरक्षा आयुक्तांकडून विचारपूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे २१ नोव्हेंबरला जाताना ते ९ एम.एम.चे ५६९ काडतुसे विसरले होते. यातील ४६४ काडतुसे सापडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी ते परत केले होते. मात्र, उर्वरित काडतुसे सोमवारी रेल्वेच्या मेन्टेनन्स विभागात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विभागात ही काडतुसे गेले कसे, याची विचारणा अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस अधीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहायक सुरक्षा आयुक्तांनी मंगळवारी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केली.सोमवारी १८ मार्चला दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील मेन्टेनन्स विभागाच्या बैठक खोलीत खर्ड्याच्या तीन बॉक्समध्ये ९ एम.एम.चे ९८ जिवंत काडतुसे आढळले. येथील कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (३७) रा. मानकापूर, सादिकाबाद हा खोली साफ करत असताना त्याला हे जिवंत काडतुसे मिळाले होते. या घटनेची माहिती त्याने वरिष्ठांना दिली. लगेच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. सिनिअर सेक्शन इंजिनिअर धनंजय काणे यांनीही लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधला. माहिती मिळताच आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मोगरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आढळलेली काडतुसे हेतुपरस्सर कुणीतरी लपवून ठेवली असून संधी मिळाल्यानंतर तो ती घेऊन गेला असता, अशी चर्चा रेल्वे वर्तुळात आहे.सात काडतूस अद्यापही गायब२१ नोव्हेंबर २०१८ रोजी इंडो-तिबेट सुरक्षा दलाच्या ७ व्या बटालियनचे जवान लखनौ येथून विजयवाडा येथे निवडणूक विशेष रेल्वेने जात असताना धावपळीत त्यांचे ९ एम.एम.चे ५६९ काडतूस विसरले होते. त्यापैकी ४६४ काडतूस लोहमार्ग पोलिसांनी परत केले. त्यानंतर सोमवारी ९८ काडतुसे सापडले. परंतु अद्यापही ७ काडतुसे गायब आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक वासुदेव डाबरे करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर