शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

किती ही क्रूरता... नऊ महिन्यांच्या बाळाला मारहाण, दिवसा झोपू नये म्हणून काढायची चिमटे

By योगेश पांडे | Updated: April 30, 2024 00:33 IST

बाळाला सांभाळणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : घर आणि करिअर सांभाळताना मुलाबाळांकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून खाजगी कंपनीच्या माध्यमातून बाई कामावर ठेवणे एका महिलेसाठी मन:स्ताप देणारेच ठरले. आईने बाळ दुसऱ्या खोलीत घेऊन जावे यासाठी संबंधित तरुणीने चक्क नऊ महिन्यांच्या बाळाला मारहाण केली. आपली स्वत:ची रात्रीची झोपमोड होऊ नये व दिवसा बाळ झोपू नये यासाठी ती त्याला चिमटेदेखील काढायची अशी धक्कादायक बाबदेखील समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

तक्रारदार महिला गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते व दोघेही नवराबायको नोकरी करतात. तिला ९ महिन्यांचा मुलगा असून त्याला सांभाळण्यासाठी तिने डी.सी.सी. नावाच्या कंपनीच्या माध्यमातून एका तरुणीला कामावर ठेवले. तिच्याकडे एकूण दोन तरुणी कामावर होत्या. त्यातील अंकिता ही बाळाला सांभाळायची तर दुसरी तरुणी घरची कामे करायची. दोघीही २४ तास महिलेकडेच रहायच्या. २५ एप्रिल रोजी महिलेला दुसऱ्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ती तिथे गेली असता अंकिता त्याला मारत होती. महिलेने तिला जाब विचारला असता मी मारलेच नाही अशी अंकिताने भूमिका घेतली.बाळाच्या पाठ व पायावर मारल्याच्या खुणा होत्या. त्यानंतर महिलेने डी.सी.सी. कंपनीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी येऊन तरुणीला घेऊन गेले. महिलेने सोनालीकडे चौकशी केली असता अंकिता दिवसा बाळाला चिमटे काढायची व त्याला मारायची अशी माहिती तिने दिली. रात्री बाळ झोपले पाहिजे यासाठी दिवसा त्याला झोपू द्यायचे नाही असे अंकिता म्हणायची. त्यामुळेच बाळ दुपारी झोपले की चिमटे काढून त्याला ती उठवायची. 

हा प्रकार ऐकल्यावर महिलेला धक्काच बसला व तिने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून अंकिता नावाच्या तरुणीविरोधात अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस