शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

कसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 7:00 AM

कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देकाही कोरोनाबाधितांशी मनपाकडून संपर्कच नाहीअधिकाऱ्यांचे दावे हवेतच, वस्तुस्थिती वेगळीच

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याचे चित्र असताना प्रशासनाचा गलथानपणादेखील समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात तर काही कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाबाधितांशी संपर्क साधला जातो व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी होते, असे मनपाच्या अधिकाºयांकडून सांगितले जाते. मात्र लोकमतसमवेत काही जणांनी संपर्क केला असता मनपाचा हा दावा पूर्णत: खरा नसल्याची बाब समोर आली. गोपालनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. त्यानंतर मनपाच्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता कुणीही प्रतिसाद दिला नाही. तिसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीची पत्नी पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाचे कर्मचारी घरावर स्टिकर लावायला आले. मात्र पती पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही मनपाकडे माहितीच नव्हती.

आश्चर्याची बाब म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्या सात ते आठ व्यक्तींची नावे व पत्ता लिहून घेतला. मात्र संबंधितांना ना कुठला फोन केला ना त्यांना कुणी जाऊन भेटले. अशा स्थितीत त्यांची चाचणी करण्याची बाब तर दूरच राहिली. असे प्रकार केवळ एकदाच झाले आहेत असे नाही. तर काही जणांनी आमच्यासोबतदेखील असेच झाले असल्याचे लोकमतला सांगितले.संपर्कात आलेल्यांना १० ते १२ दिवसांनी जाताहेत फोनकोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग व टेस्टिंग होणे आवश्यक आहे. ज्या बाधितांशी संपर्क साधण्यात येत आहे त्यांच्याकडून संपर्कात आलेल्यांची नावे व माहिती घेतली जाते. मात्र अनेकांना त्यानंतर १० ते १२ दिवसांनी संपर्क साधला जात आहे. इतक्या मोठ्या कालावधीत संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येते. जर ती व्यक्ती बाधित असेल तर मग कोरोनाचा आणखी फैलाव होण्याचा धोका असतो.अचानक का बदलली परिस्थितीसुरुवातीच्या काळात अधिकारी व कर्मचारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गंभीरतेने करत होते. मात्र आता या प्रक्रियेत काहीशी शिथिलता आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तसे अनुभवदेखील शहरात काही लोकांना आले आहेत. अचानक ही स्थिती का बदलली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस