मॉडेल टाऊनमध्ये घराला आग
By मंगेश व्यवहारे | Updated: May 25, 2024 15:32 IST2024-05-25T15:31:45+5:302024-05-25T15:32:12+5:30
Nagpur : १० हजार रुपयांच्या नुकसान झाल्याचा अंदाज

House fire in Model Town
नागपूर : शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास इंदौरा चौक मॉडेल टाऊन येथील रहिवासी सुनंदा अनिल शेंडे यांच्या घराला आग लागली. घटनेची माहिती मिळताच सुगतनगर अग्निशमन केंद्रातून गाडी घटनास्थळी रवाना झाली. आगीत घरातील कपडे, कुलर, प्लास्टीक टेबल, इलेक्ट्रीक वायर व छताचे लाकूड जळाले.
विभागाने केलेल्या पंचनाम्यात १० हजार रुपयांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र आगीच्या घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही. विशेष म्हणजे घरात दोन सिलेंडर होते. त्यांना आग लागली असती तर मोठा घातपात झाला होता. पण सिलेंडर सुरक्षित राहिले. शहरात आगीच्या घटना वाढल्या असून, गेल्या ७ दिवसात आगीच्या ८ घटना घडल्या आहेत.