अपघातानंतर ॲॅॅॅम्ब्युलन्स यायला तासभर उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:44+5:302021-02-13T04:09:44+5:30
नागपूर : रस्त्यावर अपघात झाल्यावर १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यास अल्प वेळात तुमच्यापर्यंत रुग्णवाहिका पाेहचेल, असा दावा आराेग्य विभागाकडून नेहमीच ...

अपघातानंतर ॲॅॅॅम्ब्युलन्स यायला तासभर उशीर
नागपूर : रस्त्यावर अपघात झाल्यावर १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यास अल्प वेळात तुमच्यापर्यंत रुग्णवाहिका पाेहचेल, असा दावा आराेग्य विभागाकडून नेहमीच केला जाताे. मात्र शुक्रवारी हे दावे फाेल ठरले. दुपारी एका तरुणाचा अपघात झाल्यावर त्वरित त्या क्रमांकावर फाेन करण्यात आला. मात्र तासभर उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पाेहचली नाही. रुग्णवाहिका नंतर पाेहचली पण ताेपर्यंत जखमी तरुणाला दुसऱ्या वाहनाने रुग्णालयात हलविण्यात आले हाेते.
शुक्रवारी दुपारी ३.५५ वाजताच्या सुमारास बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघातात एक व्यक्त गंभीर जखमी झाला. ही स्थिती लक्षात घेता रस्त्याने जाणाऱ्या जागरूक नागरिकाने त्वरित १०८ क्रमांकावर संपर्क करून घटनेची माहिती दिली. पाच मिनिटांनंतर त्यांना रुग्णवाहिका निघत असल्याचा फाेन आला. यादरम्यान त्या तरुणाने बुटीबाेरी पाेलीस स्टेशनलाही फाेन केला. त्यामुळे पाेलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्या जखमी व्यक्तीला रुग्णालयातही पाेहचविले. यानंतर म्हणजे १ तास ३ मिनिटानंतर रुग्णवाहिका चालकाने पाेहचल्याचे सांगत घटनास्थळाचा पत्ता विचारला. तेव्हा संबंधित तरुणाने जखमी व्यक्तीला आधीच रुग्णालयात पाेहचविल्याचे सांगितल्याने रुग्णवाहिका परत फिरली.
रुग्णवाहिका कुठे थांबून राहतात...
नागरिकांना हा अनुभव कायमच येत असताे. १०८ क्रमांकावर फाेन केल्यानंतर वेळेवर कधीच रुग्णवाहिका पाेहचत नाही. उल्लेखनीय म्हणजे बुटीबाेरी औद्याेगिक क्षेत्र असल्याने या परिसरात नेहमीच अपघात हाेत असतात. त्यामुळे १०८ क्रमांकावरील रुग्णावाहिकेची नेहमीच गरज असते. मात्र या भागात रुग्णवाहिका उपलब्धच हाेत नाही. कारण या रुग्णवाहिकेला जामठा किंवा टाेल नाक्यावर ठेवले जाते. यामुळेच ती वेळेवर पाेहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.