नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना कचरा प्रक्रिया बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:43 IST2018-12-01T11:42:15+5:302018-12-01T11:43:39+5:30
शहरातील हॉटेल, लॉन व मोठ्या इमारतींमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिक व इमारतींना निघणाऱ्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावी लागणार आहे.

नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना कचरा प्रक्रिया बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याचा विचार करता शहरातील हॉटेल, लॉन व मोठ्या इमारतींमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिक व इमारतींना निघणाऱ्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावी लागणार आहे. यासाठी आपल्या परिसरातच प्रक्रिया करून खतनिर्मिती करावयाची आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात संबंधिताना निर्देश दिले आहेत.
शहरात कचऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण आवश्यक
घनकचरा व्यवस्था अधिनियम-२०१६ अन्वये सर्व घराघरातून संकलित केला जाणारा कचरा ओला व सुका वर्गीकृत करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरिकांनी घरात जमा होणारा कचरा ओला व सुका वर्गीकृत करून महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीला द्यावा. घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करावी. यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती सुनील कांबळे यांनी दिली.