नागपूर बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:45 IST2017-12-07T00:39:12+5:302017-12-07T00:45:26+5:30
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री गणेशपेठच्या एका हॉटेलवर धाड टाकून रशियन युवतींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या जॉन मिलन (३४) रा. खलाशी लाईन या दलालास अटक केली आहे.

नागपूर बसस्थानकनजीकच्या हॉटेलमध्ये देहव्यवसाय , रशियन बालांना अटक
ऑनलाईन लोकमत
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री गणेशपेठच्या एका हॉटेलवर धाड टाकून रशियन युवतींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या जॉन मिलन (३४) रा. खलाशी लाईन या दलालास अटक केली आहे. जॉन अनेक दिवसांपासून देहव्यापार करून घेत असल्याची शंका आहे. काही काळापूर्वी तो गुन्हे शाखेचा खबऱ्या होता. काही दिवसांपासून गुन्हे शाखेशी त्याचे संबंध खराब झाले. पथकाला जॉनच्या एसटी स्टँड येथील हॉटेल द्वारकामाईच्या रुम नं. ४१२ मध्ये देहव्यवसायाची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून जॉनला रंगेहात पकडले. हॉटेलच्या खोलीतून रशियन युवतीची सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणेशपेठ पोलिसांना त्याची माहिती नव्हती. गुन्हे शाखेचे पोलिसही चुप्पी साधून होते.