गुंडांचा चाकूने जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST2020-12-03T04:17:34+5:302020-12-03T04:17:34+5:30

नचा अल्पवयीनवर जीवघेणा हल्ला नागपूर : अल्पवयीन मुलीला एकटी बघून घरात शिरलेल्या गुंडांनी तिच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ...

Hooligan knife attack | गुंडांचा चाकूने जीवघेणा हल्ला

गुंडांचा चाकूने जीवघेणा हल्ला

नचा अल्पवयीनवर जीवघेणा हल्ला

नागपूर : अल्पवयीन मुलीला एकटी बघून घरात शिरलेल्या गुंडांनी तिच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. लता खापेकर यांची १४ वर्षीय मुलगी सोमवारी रात्री घरी एकटी होती. त्यावेळी वस्तीत राहणारा महेश बुरडे (२८) व त्याचा भाऊ शुभम बुरडे पाणी मागण्यासाठी लताच्या घरी आला. मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितले. एकटी मुलगी असताना घरात का शिरले याचा जाब विचारण्यासाठी लता खापेकर या १७ वर्षीय मुलगा रोहित याच्यासोबत आरोपींच्या घरी गेली. दोन्ही आरोपींना घरी का आले, याचे उत्तर मागत होती. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यांनी रोहितला चाकू मारून हत्येचा प्रयत्न केला. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

बैरामजी टाऊनमध्ये चोरी

नागपूर : बैरामजी टाऊन मध्ये एका घरातून रोखसह सव्वा लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चिटणीस ले-आऊट येथील सलमा मुमताज मिर्जा ह्या २८ नोव्हेंबर रोजी बहिणीच्या घरी गेल्या. त्याच दरम्यान घराचे कुलूप तोडून आरोपींनी आत प्रवेश केल्या. चोरट्यांनी रोख आणि दागिन्याबरोबरच घरात लागलेला डीव्हीआर सुद्धा नेला. सदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- कळमना, बेलतरोडी, एमआयडीसीत आत्महत्या

नागपूर : कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बालाजीनगर येथे राहणारे आशिष विनोद पांडे (१७) या अल्पवयीन युवकाने घरातील गळफास लावून आत्महत्या केली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवार लेआऊट, दत्तनगर, बेसा येथील दिलीप नानाजी पचारे (५०) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाई आंबेडकरनगर येथील परमानंद हरिषचंद मेंढे (४०) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

- वाठ्यात अपघातात एकाचा मृत्यू

नागपूर : सायकलने जात असताना झालेल्या अपघातात इंद्रराज कोंडुजी कठाणे (२२) रा. साईबाबानगर याचा मृत्यू झाला. २६ नोव्हेंबर रोजी तो सकाळी सायकलने कामावर जात होता. वाठोडा ठाण्याच्या हद्दीतील जुन्या पांदण रोडवर त्याचा अपघात झाला. त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. ३० नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Hooligan knife attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.