हॅण्डबॉलपटू पूनमचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:06 IST2017-11-14T00:06:12+5:302017-11-14T00:06:35+5:30
थायलंडमधील आंतरराष्टÑीय हॅण्डबॉल स्पर्धेत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करणारी नागपूरची प्रतिभावान खेळाडू पूनम गणेश कडव हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सत्कार केला.

हॅण्डबॉलपटू पूनमचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थायलंडमधील आंतरराष्टÑीय हॅण्डबॉल स्पर्धेत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करणारी नागपूरची प्रतिभावान खेळाडू पूनम गणेश कडव हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सत्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टÑीय विमानतळावर नागपूर जिल्हा हौशी हॅण्डबॉल संघटनेच्या पदाधिकाºयांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेत आंतरराष्टÑीय खेळाडूंना नोकरीत सामावून घेण्याची विनंती केली. यावेळी पूनम देखील उपस्थित होती. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विपीन कामदार, त्यांच्या पत्नी श्रीमती कामदार, सचिव डॉ. सुनील भोतमांगे, सहसचिव पंकज कोठारी, सदस्य डॉ. सुरेंद्र तिवारी यावेळी उपस्थित होते.