गृहमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची दीक्षाभूमीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:53+5:302021-02-05T04:55:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट ...

गृहमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची दीक्षाभूमीला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. परिसरातील बोधिवृक्षासह परिसराची पाहणी केली.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे विदर्भाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेवर आहेत. सोमवारी ते नागपूर दौऱ्यावर आले. नागपूर दौऱ्याची सुरुवात त्यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन केली. यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते भिक्खु संघाला संघदान करण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या हस्ते जयंत पाटील यांना बुद्धमूर्ती प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गवाने, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, मनपा पक्षनेते दुनेश्वर पेठे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, राजाभाऊ टाकसाळे, नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, कार्याध्यक्ष राजू राऊत, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, प्रा. सुरेंद्र मोरे आदी उपस्थित होते.