तुरकमारी येथे घरफाेडी, ६९ हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:38+5:302021-02-18T04:14:38+5:30

बुटीबाेरी : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने व राेख रकमेसह ६९ हजार रुपयांचा ऐवज चाेरून नेला. ही घटना ...

Home burglary at Turkmari, Rs 69,000 looted | तुरकमारी येथे घरफाेडी, ६९ हजाराचा ऐवज लंपास

तुरकमारी येथे घरफाेडी, ६९ हजाराचा ऐवज लंपास

बुटीबाेरी : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने व राेख रकमेसह ६९ हजार रुपयांचा ऐवज चाेरून नेला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तुरकमारी, ड्रीम वसाहत येथे मंगळवारी (दि.१६) उघडकीस आली.

कमलेश सुखदेवे (३५, रा. हिंगणघाट, जि. वर्धा) हे प्लाॅट नं. ६६, ड्रीम वसाहत क्र १, तुरकमारी येथे वास्तव्यास असून, ते बुटीबाेरी एमआयडीसीतील एस. के. रिफ्रेक्टरी येथे एच.आर. सहायक पदावर कार्यरत आहेत. कमलेश सुखदेवे हे ११ फेब्रुवारीला पत्नीच्या प्रसूतीकरिता मूळगावी हिंगणघाट येथे गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराच्या मागील दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने बेडरूममधील आलमारीमध्ये ठेवलेले १५ ग्रॅम साेन्याची पाेतहार, तीन ग्रॅम साेन्याचे कानातील दागिने, सहा ग्रॅमच्या दाेन अंगठ्या, अडीच ग्रॅम साेन्याची अंगठी व इतर असे एकूण ३७ ग्रॅम साेन्याचे दागिने, सात ताेडे चांदीचे दागिने, घड्याळ आणि राेख ५,००० रुपये असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. शिवाय चाेरट्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले हाेते. सुखदेवे हे मंगळवारी घरी आले असता, त्यांना घरात चाेरी झाल्याचे आढळून आल्याने त्यांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बुटीबाेरी पाेलीस करीत आहेत.

Web Title: Home burglary at Turkmari, Rs 69,000 looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.