शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अवघ्या ५० लाखांसाठी राज्यातील एचआयव्हीबाधितांचा टांगला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 10:36 IST

‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेजिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबईत जावे लागते. वर्ष होऊनही केवळ ५० लाखांचे हे उपकरण अद्यापही खरेदी झालेले नाही. अनेक एचआयव्हीबाधित या तपासणीसाठी मुंबईला जात नसल्याचे सामोर आले आहे.

ठळक मुद्देमंजुरीनंतरही वर्षभरापासून ‘व्हायरल लोड’ यंत्राची प्रतीक्षाविदर्भातील बाधितांना गाठावे लागते मुंबई

सुमेध वाघमारे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेजिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबईत जावे लागते. नागपुरात ही सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘एआरटी’सेंटरसाठी ‘व्हायरल लोड’ उपकरणाला मंजुरी देण्यात आली. मात्र वर्ष होऊनही केवळ ५० लाखांचे हे उपकरण अद्यापही खरेदी झालेले नाही. धक्कादायक म्हणजे, अनेक एचआयव्हीबाधित या तपासणीसाठी मुंबईला जात नसल्याचे सामोर आले आहे. यांची संख्या प्रत्येक केंद्रावर साधारण ५० टक्के असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.एचआयव्हीबाधितांना वेळेत उपचार व्हावेत , यासाठी सरकारने २००५ मध्ये ‘एआरटी’ सेंटर सुरू केले. ज्या बाधितांना ‘एआरटी’चे रेजिस्टंट झाले आहे त्यांच्यासाठी ‘सेकंड लाईन’ उपचारपद्धती नागपुरात २०११ पासून सुरू झाली. आता ही उपचारपद्धती यवतमाळ आणि अकोला येथेही सुरू आहे. या केंद्रामध्ये उपचारासाठी येणारा रु ग्ण आधीच शरीराने व मनाने खचलेला असतो. उपचारासोबत त्याला मानसिक आधार देणे गरजेचे असते.प्रतिकार शक्तीच नसल्याने अशा रु ग्णांना कोणत्याही आजाराचा संसर्ग लवकर होण्याची भीती असते. अशावेळी औषधांचा प्रतिरोध झाल्यास रु णाच्या रक्तातील ‘सीडी फोर’ मोजले जाते, मात्र रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यासाठी शासनाकडून कुठलीही सवलत दिली जात नाही. आधीच रुग्णाची प्रकृती खालवली असल्याने त्यांना हा लांबचा प्रवास झेपत नाही. विशेष म्हणजे सेंकड लाईनच्या रुग्णाला दर सहा महिन्यांनी चाचणीसाठी मुंबईला जावे लागत असल्याने अनेक गरीब रुग्ण जाण्याचे टाळतात. या शिवाय मुंबईतल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर रिपोर्ट मिळण्यासही उशीर होत असल्याने उपचारातही उशीर होतो.

वर्षभरापूर्वीच ‘नॅको’ने दिली मंजुरीमिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’ने (नॅको) नागपूरच्या मेडिकलमधील एआरटी सेंटरसाठी सुमारे ५० लाखांचे ‘व्हायरल लोड’ यंत्र खरेदी करण्याला मंजुरी दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून हे यंत्र खरेदी होणार होते. परंतु नंतर काय झाले याचे कुणालाच माहीत नाही. विशेष म्हणजे, या यंत्रासोबत तंत्रज्ञ, स्वतंत्र वातानुकूलित जागेचीही गरज असून ती कोण सोडविणार हाही प्रश्न आहे.

५० टक्के रुग्ण ‘व्हायरल लोड’पासून वंचित‘सेकंड लाईन’ उपचार पद्धती सुरू असलेल्या ‘एआरटी’केंद्राच्या एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, रजिस्टर झालेल्या बाधितांचे समुपदेशन केल्यानंतरही ते ‘व्हायरल लोड’ साठी मुंबईत जात नाही. अशा रुग्णांकडून आम्ही लेखी लिहून घेतो. यांची संख्या सुमारे ५० टक्के आहे.

नागपुरात ‘व्हायरल लोड’ मशीन आवश्यकमेडिकलच्या एआरटी केंद्रावर सेकंड लाईन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच एचआयव्हीबाधितांना दर सहा महिन्यातून रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी (व्हायरल लोड) मुंबईला जावे लागते. अनेकांना हा प्रवास व प्रवसाचा खर्च, तेथे राहण्याचा खर्च झेपत नाही. अनेकांना याचे महत्त्व सांगूनही जात नाही. अशा रुग्णांच्या जीवाला धोका संभावतो. यामुळे नागपुरात ‘व्हायरल लोड’ मशीन उपलब्ध करून देणे अधिक गरजेचे आहे.-बबिता सोनीअध्यक्ष, संजीवन बहुउद्देशीय समाज सेवा संस्था

टॅग्स :Healthआरोग्य