शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गिनीज रेकॉर्डसह रचला इतिहास ! राष्ट्रसंतांच्या गीताच्या सामूहिक गायनाने चार जागतिक विक्रमांची नोंद

By आनंद डेकाटे | Updated: October 11, 2025 17:50 IST

राष्ट्रसंतांना नागपूर विद्यापीठाची अनोखी आदरांजली : 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...' या विद्यापीठ गीताच्या सामुहिक गायनाचे चार जागतिक विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झालेल्या सामूहिक विद्यापीठ गीत गायनाने इतिहास रचला आहे. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...’ या विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाच्या माध्यमातून विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह चार जागतिक विक्रमांची नोंद केली. या उपक्रमात एकूण ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १५ हजारांहून अधिक जण प्रत्यक्ष उपस्थित होते आणि १५ हजारांहून अधिक सहभागी ऑनलाईन स्वरूपात जोडले गेले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर विश्वविक्रमी कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण चार विश्वविक्रमाची ऐतिहासिक नोंद केली. विद्यापीठाने केलेल्या या विक्रमी उपक्रमात एकाच गाण्याचे सामूहिक गायन करीत एकाच गाण्याच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन व्हिडीओ अल्बमसाठी’  गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. या प्रकारात आधीचा ५ हजार जण सहभागी होण्याचा विक्रम विद्यापीठाने शनिवारी मोडला. यामध्ये १५,४०२ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. यासोबतच विद्यापीठ गीत गाण्यात एकाच वेळी सर्वात मोठा सहभाग या प्रकारात 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' देखील विद्यापीठाने केला. जास्तीत जास्त सहभागींनी विद्यापीठाचे गाणे गायले या प्रकारात विद्यापीठाने 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया' या विक्रमाची देखील नोंद केली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन (इंग्लंड) यांनी यावेळी अधिकृत घोषणा करून विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे आणि आयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान केले.

याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे, कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त उपसेन बोरकर , अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी, डॉ. समय बनसोड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षक इंग्लंड येथील इमा ब्रेन, मिलिंद वेर्लेकर, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे संजय नार्वेकर व सुषमा नार्वेकर, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. मनोज तत्ववादी प्रामुख्याने उपस्थित होते. 

राष्ट्रसंतांचा मानवता धर्माचे अनुकरण करा - नितीन गडकरी

जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक समर्पक ठरतो. विद्यापीठाने स्वीकारलेल्या गीतातून राष्ट्रसंतांनी मानवतेचा सुंदर भाव दिला आहे. मानवतेच्या धर्म पेक्षा कोणताही धर्म, जात, पंथ मोठा नाही. मानवता धर्माचे अनुकरण करणे हीच राष्ट्रसंतांना खरी आदरांजली ठरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

ग्रामगीतेतून जीवनदर्शन - भारत गणेशपुरे

सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ग्रामगीतेतील 'बायका मुलांची चिंता लागली म्हणून वैराग्य घेतले... आदी ओवींच्या माध्यमातून आपले जीवन कसे असावे याबाबत आपल्या विनोदी शैलीतून मार्गदर्शन केले. काहीही करा- पण मनापासून करा, असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur University's Mass Singing Sets Four World Records, Including Guinness

Web Summary : Nagpur University created history with a mass singing of its university anthem, setting four world records, including a Guinness World Record. Over 15,000 students participated in person, with thousands more joining online, celebrating the legacy of Rashtrasant Tukdoji Maharaj. Nitin Gadkari and other dignitaries were present.
टॅग्स :nagpurनागपूरguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ