शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

वर्षभरात विक्रमी विकास कामे करून नागपूर एचसीबीएने घडविला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 8:44 PM

प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणताही अडथळा विकासाचा मार्ग रोखू शकत नाही, हे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए)च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात संघटनेने अवघ्या वर्षभरात विक्रमी कामे करून इतिहास घडविला. आकर्षक विकास कामांमुळे संघटनेच्या परिसराचा चेहरामोहरा पालटला आहे. सर्वात शेवटी विकसित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट चेंबर व मिटिंग हॉलचे गुरुवारी वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व आनंद जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संघटनेची विकास मोहीम या उद्घाटनानंतर १०० टक्के पूर्ण झाली.

ठळक मुद्देपरिसराचा चेहरामोहरा पालटला : गुरुवारी झाले अंतिम विकास कामांचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणताही अडथळा विकासाचा मार्ग रोखू शकत नाही, हे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए)च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात संघटनेने अवघ्या वर्षभरात विक्रमी कामे करून इतिहास घडविला. आकर्षक विकास कामांमुळे संघटनेच्या परिसराचा चेहरामोहरा पालटला आहे. सर्वात शेवटी विकसित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट चेंबर व मिटिंग हॉलचे गुरुवारी वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व आनंद जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संघटनेची विकास मोहीम या उद्घाटनानंतर १०० टक्के पूर्ण झाली.अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी स्वच्छतेची समस्या सोडविली. स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिंग केले. संघटनेने वकिलांना वाटप केलेले लॉकर्स परिसरात अस्ताव्यस्त ठेवलेली होती. त्यामुळे मोकळेपणा जाणवत नव्हता. नवीन कार्यकारिणीने सर्व लॉकर्स एका ठिकाणी ठेवण्यासाठी नवीन जागा विकसित केली. त्या ठिकाणी लॉकर्स हलवल्यानंतर परिसर मोकळा व स्वच्छ झाला. सर्व परिसरात पीओपी, लायटिंग व कलरिंग करण्यात आले. वकिलांचे पाच मोठे हॉल्स व सहा खोल्यांचे वकिलांच्याच आर्थिक योगदानातून आकर्षक नूतनीकरण करण्यात आले. रंगरंगोटी, पीओपी, लायटिंग, पडदे, पंखे, फ्लोअर मॅट, नवीन टेबल व खुर्च्या यामुळे हॉल व खोल्या चकाचक झाल्या. परिसरात राज्यघटनेतील प्रस्तावनेची शिळा बसविण्यात आली. पार्किंग व्यवस्थेत प्रभावी बदल करण्यात आला. वकिलांना पक्षकारांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करता यावी यासाठी कॉन्फरन्स चेंबर तयार करण्यात आले. अ‍ॅड. आर. के. मनोहर स्मृती एचसीबीए ग्रंथालयाचे नूतनीकरण करण्यात आले. ग्रंथालयातील बसण्याची व्यवस्था सुधारण्यात आली. आवश्यकतेनुसार सर्व पुस्तके खरेदी करण्यात आली. ई-लायब्ररी अत्याधुनिक करण्यात आली. जागेच्या कमतरतेमुळे ३०० वकिलांच्या बसण्यासाठी जागा मिळण्याचे अर्ज प्रलंबित होते. संघटनेने उपलब्ध जागेतच नवीन विकासकामे करून १७० वकिलांना बसण्यासाठी जागा दिली. कॅन्टीन व स्वच्छतागृहाचा फाईव्ह स्टारप्रमाणे कायापालट करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन वॉटर कूलर बसविण्यात आले. देशातील कोणत्याही न्यायालयात वकिलांच्या लिपिकांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा नाही. परंतु, या संघटनेने लिपिकांसाठीही बसण्याची व्यवस्था करून आदर्श निर्माण केला. लिपिक व संघटनेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश ठरवून देण्यात आला. बाहेरगावातील वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली. यासह अन्य बरीच कामे संघटनेने केली.हे आहेत संघटनेचे शिलेदारविक्रमी कामांद्वारे आदर्श निर्माण करणाऱ्या संघटनेच्या शिलेदारांमध्ये अ‍ॅड. अनिल किलोर (अध्यक्ष), अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर (सचिव), अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. गौरी वेंकटरामन (उपाध्यक्ष), अ‍ॅड. भूषण मोहता (सहसचिव), अ‍ॅड. उमेश बिसेन (ग्रंथालय प्रभारी), अ‍ॅड. प्रीती राणे (कोषाध्यक्ष), अ‍ॅड. एस. आर. चरपे, अ‍ॅड. पी. एम. अंजीकर, अ‍ॅड. के. सी. देवगडे, अ‍ॅड. ए. ए. पन्नासे, अ‍ॅड. सोनाली सावरे, अ‍ॅड. मीर नगमान अली, अ‍ॅड. डी. ए. सोनवाणे, अ‍ॅड. जयश्री जुनघरे व अ‍ॅड. प्राची कोरटकर (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.आता लक्ष्य नवीन इमारतसार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा बंगला असलेल्या परिसरातील जमिनीचा एक तुकडा हायकोर्ट न्यायिक अधिकाऱ्यांसाठी कार्यालये व वकिलांना बसण्यासाठी खोल्या बांधण्याकरिता देण्यात आला आहे. तो भूखंड हायकोर्ट प्रशासनाने स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. या भूखंडावरील इमारत लवकरात लवकर बांधून पूर्ण करणे हे संघटनेचे आगामी लक्ष्य आहे.अ‍ॅड. अनिल किलोर

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर