हिमांशु भोयर नागपुरात ‘टॉप’
By Admin | Updated: June 12, 2017 02:21 IST2017-06-12T02:21:52+5:302017-06-12T02:21:52+5:30
‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला.

हिमांशु भोयर नागपुरात ‘टॉप’
‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल जाहीर : १५० हून अधिक विद्यार्थी पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशु भोयर हा अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर ९७ वा क्रमांक पटकाविला. नागपूर शहरातून दीडशेहून अधिक विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विविध महाविद्यालयांतून प्राप्त झाली.
‘जेईई-मेन्स’मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘जेईई-अॅडव्हान्स’साठी पात्र ठरले होते. २१ मे रोजी ‘जेईई-अॅडव्हान्स’ची परीक्षा पार पडली. ‘जेईई-मेन्स’मध्ये हिमांशु भोयरचा अखिल भारतीय पातळीवर १४५ वा क्रमांक होता. हिमांशुपाठोपाठ ‘जेईई-अॅडव्हान्स’च्या निकालात शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा समीर पांडे (एआयआर-१०४) याने बाजी मारली. त्याचप्रमाणे दुर्गेश अग्रवाल (एआयआर-१२४), अंशुल नासेरी (एआयआर-१३७), चैतन्य भूतडा (एआयआर-२४५), प्राग्य रस्तोगी (एआयआर-२७९), अंशुल नांदगावकर (एआयआर-२३७), प्रवीण कोडापे (एआयआर-४६२), कपिल मांडवकर (एआयआर-६०५), अमन ताराचंद राय (एआयआर-७१०), अजिंक्य बोकडे (एआयआर-७८४), हर्ष त्रिवेदी (एआयआर-८४३), हर्ष डोल्हारे (एआयआर-८५५), नेहांक गोंडाणे (एआयआर-८६३), पियुष चव्हाण (एआयआर-८७३) यांनीदेखील पहिल्या हजार विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविण्यात यश मिळविले.खुल्या प्रवर्गातून ५७७ व्या क्रमांकावर असणाऱ्या अखिलेश गणेशकर या विद्यार्थ्याने अनुसूचित जाती प्रवर्गात देशातून आठवा क्रमांक पटकाविला. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून २५ विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून ‘आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.