शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:07 IST

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला अटक करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) दोन वारांगनांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदोन वारांगना ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला अटक करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) दोन वारांगनांना ताब्यात घेतले. साबिया कौसर शौकत उल्लाह खान (साबिया रियासत अहमद, वय ३३) असे रॅकेट चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे. ती फ्रेण्डस कॉलनीतील कोलबा स्वामी कॉलनीत राहते.साबिया गेल्या अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालविते. मोठमोठे हॉटेल्स, लॉज आणि फार्म हाऊसमध्ये ती हायप्रोफाईल वारांगना पोहचवते. तिच्याकडे महाविद्यालयीन विद्यार्थिनींपासून पतीपासून विभक्त झालेल्या तसेच विवाहित महिलांची भली मोठी यादी आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार ती पाहिजे त्या ठिकाणी वारांगना उपलब्ध करून देते. तिच्या गोरखधंद्याची कल्पना मिळताच एसएसबीने कारवाईचा सापळा लावला. साबियासोबत पोलिसाच्या पंटरने संपर्क साधून दोन वारांगनांची मागणी केली. एक महाविद्यालयीन तरुणी (वय २२) आणि दुसरी महिला (वय ३२) उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवून साबियाने वारांगनांना घेऊन जाण्यासाठी ग्राहकाला पागलखाना चौकाजवळ बोलविले. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी पोलिसांचे दोन ग्राहक पागलखाना चौकाजवळ पोहचले. त्यांना साबियाने देहविक्रय करणाऱ्या दोन वारांगना उपलब्ध करून देताच एसएसबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. साबियाच्याविरुद्ध मानकापूर ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, एएसआय दामोदर राजुरकर, सुभाष खेडकर, बळीराम रेवतकर, हवलदार मुकूंदा गारमोरे, संजय पांडे, मनोज चव्हाण, नायक चंद्रशेखर घागरे, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्या प्रीती सावरकर आणि सविता रेलकर यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :raidधाडSex Racketसेक्स रॅकेट